Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

आजचे राशिभविष्य : सर्व 12 राशींसाठी कसा राहील सोमवार तसेच महिन्यातील पहिला दिवस

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 01, 2019, 12:00 AM IST

आजचा दिवस 12 पैकी 5 राशींसाठी चांगला राहील.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi
    एप्रिल महिन्याचा पहिला दिवस तसेच सोमवारी भागवत एकादशी आहे. आजच्या दिवस दिशा शूल पूर्वेस राहील. यात सकाळी 6.35 ते 8.07 वाजेपर्यंत अमृत योग आणि सकाळी 9.39 पासून 11.11 पर्यंत शुभ योग राहील. यानंतर दुपारी 3.48 पासून सायंकाळी 5.20 वाजेपर्यंत लाभ आणि त्यानंतर 6 वाजून 52 मिनिटांपर्यंत अमृत योग आहे. आजचा दिवस 12 पैकी 5 राशींसाठी चांगला राहील. तर उर्वरीत राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा राहील.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    मेष : शुभ रंग : नारिंगी | अंक : ५
    नोकरी व्यवसायात उत्साहाचे वातावरण राहील. काही नवे हितसंंबंध जुळून येतील. विवाहेच्छूकांना आशेचा किरण दिसेल. मित्र दिलेली अश्वासने पाळतील.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
    व्यावसायिकांची बाजारातील पत  वाढेल.  नोकरीत बढतीचा मार्ग सोपा होईल. उच्चशिक्षित असलात तर लठ्ठ पगाराच्या नोकऱ्या चालून येणार आहेत.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    मिथुन : शुभ रंग : तांबडा | अंक : २
    नोकारी व्यवसायात थोडयाफार अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. आज एकांताची गरज भासेल.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    कर्क:  शुभ रंग : सोनेरी | अंक : ९
    कार्यक्षेत्रात काही गुप्त शत्रू सक्रिय असू शकतात.आपल्या भावी योजना इतक्यात उघड करू नका.आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करुच नका.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    सिंह: शुभ रंग : गुलाबी | अंक : ३ 
    आर्थिक उन्नत्तीच्या काही नव्या संधी दार ठोठावतील.महत्वपूर्ण निर्णय घेताना द्विधा मन:स्थितीस लगाम घालणे गरजेचे राहील. पत्नीचा सल्ला अवश्य घ्या.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    कन्या: शुभ रंग :मोरपंखी | अंक : ८
    काही मान अपमानाच्या प्रसंगांना तोंड द्यावे लागणार आहे. मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे राहील.आज काही येणी असतील तर मात्र वसूल होऊ शकतील.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    तूळ: शुभ रंग : निळा | अंक : १
    दैनंदीन कामे फारच कंटाळवाणी वाटतील. एखाद्या करमणूकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल. मुलांसाठी वस्त्रखरेदी कराल. आज तुमचा गृहसौख्याचा दिवस.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    वृश्चिक: शुभ रंग : मरून | अंक : ६
    शिक्षण क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना मात्र प्रयत्न वाढवावे लागणार आहेत.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    धनू: शुभ रंग : राखाडी | अंक : ४
    आज तुम्ही फक्त नाकासमोर चालणे गरजेचे. अती आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होऊ शकेल. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी शेजारीच मदतीस येतील.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    मकर: शुभ रंग : जांभळा  | अंक : ३
    राशीच्या धनस्थानातून चंद्रभ्रमण सुरू असल्याने पैशाची उणीव भासणार नाही. खिशात पैसा खेळता असून तुम्ही म्हणाल ती पूर्व. तुमचा कार्यउत्साह वाढेल.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    कुंभ: शुभ रंग : पांढरा  | अंक : ९
    आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल. ज्येष्ठांची प्रकृती  ठणठणीत राहील. हट्टीपणास आवर घाला. कोणतेही निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका.

  • monday 1 april 2019 daily horoscope rashi bhavishya in Marathi

    मीन : शुभ रंग : डाळिंबी  | अंक : ७
    घरातील वडीलधाऱ्यांच्या विचाराने वागलेले हिताचे ठरेल. ज्येष्ठांनी गाठीशी असलेली पुंजी जपुन वापरावी. केवळ मोठेपणासाठी खर्च करणे टाळा. वाद नकोत

Trending