Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

रिलिजन डेस्क | Update - Jan 14, 2019, 12:00 AM IST

सोमवारचे राशिफळ : दोन शुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात, या 8 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील उत्तम

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  सोमवार, 14 जानेवारी 2019 ला रेवती नक्षत्र असल्यामुळे शिव आणि सिद्ध नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. यासोबतच आज धनुर्मास समाप्ती, भोगी आहे. आज जुळून येत असलेल्या 2 शुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. सोमवारचे ग्रह-तारे काही लोकांच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  मेष : आज दुपारनंतर आर्थिक अडचणींवर मार्ग मिळेल.आज एखादी महत्वाची बातमी कानी येईल. एखादी गहाळ झालेली वस्तू परत शोधल्यास सापडू शकेल. शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  वृषभ : खिसे भरलेले असले तरी अनावश्यक उधळपट्टी नको. दुपारनंतर एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो. अती श्रमांचा तब्येतीवर ताण पडेल. काळजी घ्या. शुभ रंग : चंदेरी | अंक : १

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  मिथुन : कार्यक्षेत्रात दुपारनंतर अनुकूल वातावरण राहील.मानसन्मानात वृध्दी होईल. मित्रांबरोबर आर्थिक व्यवहार नकोत. अधिकारांचा वापर जपून करा. शुभ रंग : सोनेरी | अंक : १

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  कर्क : आज तुम्हाला काही कामे निस्वार्थीपणाने करावी लागतील. आजच्या कष्टांचे फळ उद्या मात्र नक्कीच मिळेल. क्षुल्लक मतभेदांमुळे काही मित्र दुरावतील. शुभ रंग : भगवा | अंक : ३

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  सिंह : आज तुमच्यात आत्मविश्वासाचा अभाव राहील.कारण नसताना समोरील व्यक्तीचे दडपण येईल.महत्वपूर्ण निर्णय उद्यावर ढकलेले बरे. संयम ठेवा. शुभ रंग : आकाशी | अंक : ६ 

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  कन्या : वैवाहीक जिवनांत सगळ काही छान चालू असताना उगीचच जुनी भांडणे उकरून काढू नका. आजचा संध्याकाळचा वेळ फक्त जोडीदारासाठी राखीव ठेवा. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  तूळ : काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्यामागे धावण्याचा मोह टाळा. कायद्याची चौकट मोडू नका. आज फक्त नाका समोर चालणे हिताचे. शुभ रंग : जांभळा | अंक : २

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  वृश्चिक : आज महत्वपूर्ण कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. संध्याकाळी तब्येत नरमच राहील. दुखणी अंगावर काढू नका. एखादी जुनी चूक निस्तरावी लागू शकते. शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १ 

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  धनू : उद्योग व्यवसायात आघाडीवर असाल. काही घरगुती समस्यांवरही लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. गृहीणींना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल. व्यस्त दिवस. शुभ रंग : राखाडी | अंक : ७

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  मकर : जोडीदाराच्या सहाय्याने कसैटुंबिक पश्नांवर सहज मात कराल. काहीजणांना जवळपासचे प्रवास घडणार आहेत. आज जरा आईच्या तब्येतीची विचारपूस करा. शुभ रंग : केशरी | अंक : ९

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  कुंभ : आज तुम्ही मस्त रोमॅन्टीक मूड मधे असाल. उत्तम राहणीमानास प्राधान्य द्याल. आज नवी वस्त्र खरेदी कराल. शेजाऱ्यांशी आपुलकी वाढेल. छान दिवस.  शुभ रंग : डाळींबी | अंक : ४

 • aajache rashibhavishya Monday 14 January 2019 Daily horoscope in marathi

  मीन : पैशाअभावी अडून राहीलेली कामे कार्यान्वीत होतील. आज दुपारनंतर एखादी महत्वाची बातमी कानी येण्याची शक्यता आहे. आज सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील.   शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ 

Trending