आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोमवार 14 ऑक्टोबर रोजी रेवती नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...
मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : ८
आज घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम अवश्यक राहील. आपली मते इतरांस पटतीलच असे नाही.कुठेही आर्थिक गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.
वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४
कार्यक्षेत्रात तुमच्या मानसन्मानात वृध्दी होणार असून तुमच्या शब्दाला वजन राहील. विरोधकही तुमच्या यशाचा हेवा करतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.
मिथुन : शुभ रंग : तांबडा | अंक : ६
नोकरीच्या ठीकाणी तुमच्या अधिकरांत वाढ होईल.काही किचकट कामातही लक्ष घालावे लागेल. आज कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला फुरसत मिळणार नाही..
कर्क : शुभ रंग : भगवा | अंक : ८
व्यवसायात काही क्षुल्लक अडचणी बेचैन करतील. आलेल्या संधींकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. अध्यात्म मार्गाकडे आज तुमचा ओढा असेल.
सिंह : शुभ रंग : निळा| अंक : ९
फार दगदग न करता आज विश्रांती घेतलेलीच बरी.कोणत्याही कामात अती आक्रमकता आज योग्य ठरणार नाही. धाडसाची कामे आज अजिबात नकोत.
कन्या : शुभ रंग : अबोली| अंक : ७
आज तुमच्यासाठी अनुकूल दिवस असून वेळेचे योग्य नियोजन केलेत तर अनेक कामे वेळेत पूर्ण करता येतील. वैवाहीक जिवनात आज तू तिथे मी.
तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५
नोकरदारांनी आज फक्त मिटल्या तोंडी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरूणांनी व्यसने टाळावीत.आज फक्त स्वार्थ साधा. परमार्थाच्या वाटेस जाऊ नका.
वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
काही रसिक मंडळी कौटुंबिक सहलींचे बेत आखतील. चैन करण्यासाठी सढळ हस्ते पैसे खर्च करतील. आज प्रेमी युगुलांना वडीलधाऱ्यांचे अशिर्वाद मिळतील.
धनू : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
वाहन व जमिन खरेदी विषयक कामांना गती येईल. गृहीणी घर स्वछतेचे फारच मनावर घेतील. आज प्रेमप्रकरणे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.
मकर : शुभ रंग : सोनेरी| अंक : २
जवळपासचे प्रवास लाभदायक होतील. काही नवी नाती जुळून येतील. विद्यार्थी अभ्यासाची टाळाटाळ करतील. शेजारी डोकावतील पण आपलेपणानेच.
कुंभ : शुभ रंग : पिवळा | अंक : १
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही भरपूर राहील. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. आवडत्या छंदातून अर्थप्राप्ती होईल. वैवाहीक संबंधात गोडवा राहील.
मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३
कार्यक्षेत्रात कितीही चढाओढ असती तरीही दैव आज तुमच्याच बाजूने आहे. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळणारच. वाणीत मात्र आज गोडवा असणे गरजेचे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.