आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

सोमवार 2 डिसेंबर रोजी श्रवण नक्षत्र असल्यामुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज चंपाषष्ठी आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज काही लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • मेष: शुभ रंग : अबोली | अंक : ४

आज सकारात्मकता तसेच स्वावलंबन फार महत्वाचे राहील. ऐकावे जनाचे व करावे मनाचे याच तत्वाने वागणे योग्य ठरेल. आज मित्रांना दूरून रामराम ठोका.

 • वृषभ: शुभ रंग : चंदेरी | अंक : १

नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेली अश्वासने फार मनावर घेऊ नका. काही मनाविरूध्द घटनांनी नैराश्य येईल. अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांचे मनोबल वाढेल.

 • मिथुन : शुभ रंग : पिवळा | अंक : ३

काही डोक्याला ताप देणारी मंडळी भेटणार अाहेत. मतभेद झाले तरी मानसिक संतूलन ढळू देऊ नका. कामगार वर्गाने आपल्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे.             

 • कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

उद्योग व्यवसायातील पूर्वीचे नियम बदलावे लागतील.ध्येय साध्य करण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागतील. आज पत्नीने दिलेले सल्ले मोलाचे असतील.         

 • सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ८

कामगारांनी वरीष्ठांकडे केलेल्या मागण्या रास्त असल्यास मान्य होतील. ज्येष्ठांना काही आरोग्य विषयक चाचण्या कराव्या लागतील.  तब्येतीस जपा.                           

 • कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ५

आज तुम्ही मनोरंजनासाठी काही वेळ द्याल. मित्रांमधे मोठेपणा मिळवण्यासाठी तुमची धडपड राहील. आज एखाद्या लेट नाईट चित्रपटाचा आस्वाद घ्याल. 

 • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ९

कुटुंबात आर्थिक सुबत्ता राहील. भावंडांमधील वाद सुसंवादाने मिटतील. मुले पालकांच्या आज्ञेत असतील. गृहीणी आज स्वत:चे छंद जोपासतील.

 • वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ७

दैनंदीन कामे आज कंटाळवाणी वाटतील. काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. एखाद्या नवीन विषयात रूची निर्माण होईल. शेजारी सलोखा वाढेल.                                  

 • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

व्यवसायात केलेले कष्ट कारणी लागतील. यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. अनपेक्षित आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. यशदायी दिवस.

 • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

परिवारात सलोखा राहील. वडीलधाऱ्यांचे सल्ले उपयुकत असतील. काही महत्वपूर्ण बातम्या कानी येतील. अती आक्रमकता टाळा. संयम गरजेचा अाहे.

 • कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

भविष्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कराल. जास्त लाभाचा मोह टाळून सुरक्षित गुंतवणूकीस  प्राधान्य देणे गरजेचे आहे. आज प्रवासात सावध रहा.                       

 • मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन करून हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या पूर्ण कराल. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. गृहीणींना  छंदातून अर्थप्राप्ती होईल.  

बातम्या आणखी आहेत...