Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

शुक्ल नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे गणेश स्थापनेच्या दिवसाची सुरुवात जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आठवड्यातील पहिला दिवस

रिलिजन डेस्क

Sep 02,2019 12:20:00 AM IST

सोमवार 2 सप्टेंबरला भाद्रपद मासातील चतुर्थी तिथी आहे. यासोबतच आज घराघरांमध्ये श्रीगणेश स्थापना केली जाईल. आज चित्रा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांना बिझनेस, वैवाहिक आयुष्यात तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात चांगला लाभ मिळेल. प्रेमसंबंध सुधारतील. याव्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : २ उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ६ उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ३ मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना स्वत:ची शिल्लक तपासा. श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ४ अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. आनंदी दिवस.कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : २ संयमाची गरज असून अती उत्साहाच्या घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. तुम्हाला श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ३ आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणी उत्साहाने श्रीगणेशाचे स्वागत करतील.वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : ८ एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू अाहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.धनू : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६ उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.मकर : शुभ रंग : स्ट्राॅबेरी | अंक : ५ नोकरीत काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल.कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७ काही क्षुल्लक कारणाने घरात थोरांशी मतभेद होतील. आज कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोतच.मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.

मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : २ उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ६ उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ३ मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना स्वत:ची शिल्लक तपासा. श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.

सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ४ अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. आनंदी दिवस.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : २ संयमाची गरज असून अती उत्साहाच्या घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. तुम्हाला श्रीगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.

तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ३ आज तुम्हाला काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणी उत्साहाने श्रीगणेशाचे स्वागत करतील.

वृश्चिक : शुभ रंग : लाल | अंक : ८ एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू अाहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.

धनू : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६ उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील.

मकर : शुभ रंग : स्ट्राॅबेरी | अंक : ५ नोकरीत काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७ काही क्षुल्लक कारणाने घरात थोरांशी मतभेद होतील. आज कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोतच.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९ आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.
X
COMMENT