आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 21 ऑक्टोबरला पुनर्वसू नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या आठ राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. सोमवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : ४                                                       
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही. 

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ६                                                 
आज स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत. खेळाडूंनी सराव वाढवणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ५                                                                          
कौटुंबिक सदस्यांची नाराजी दूर करावी लागेल. आज जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार टाळलेले बरे.पिताश्रींच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.     


कर्क :  शुभ रंग : मोरपंखी | अंक
: ३                                                            
आवक बाजू भक्कम असेल. वादविवादात आज आपली बाजू परखडपणे मांडू शकाल. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आलेख चढता राहील. मनासारखी चैनही करता येईल.

सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : १                                                       
व्यावसायिकांना आज वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. जाहीराती वर ही भर द्यावा लागणार आहे. आज विश्रांती नाही. 

कन्या : शुभ रंग : लाल| अंक : २                                 
आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच. बेरोजगार असाल तर घरापासून लांब जायची तयारी असूद्या.अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. दगदग होईल.    

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४      
आपला स्वार्थ  साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. 

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ६  
भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल.योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्रांवर अजिबात विसंबून राहू नका.   


धनू :  शुभ रंग : आकाशी| अंक
: ५  
नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. शासकिय कामातही काही कारणाने विलंब होईल. अधिकरांचाही गैरवापर टाळायला हवा. 

मकर : शुभ रंग : अबोली| अंक : ७
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. कष्टांचाही अतिरेक टाळा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणेही गरजेचे आहे. विश्रांतीही महत्वाची. 

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ९                                                    
आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.       

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
आज आराेग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. रुग्णांनी पथ्यपाणी पाळावे अन्यथा आजार बळावेल. देण्याघेण्याचे व्यवहार रोख ठेवा. 
 

बातम्या आणखी आहेत...