आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

सोमवार 23 डिसेंबर रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय अाहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल. 

  • वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : २

घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव  राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

  • मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : १

आज तुम्हाला काही मान अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. दिवस तितकासा अनुकूल नसला तरीही आज काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.

  • कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील.

  • सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९

आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

  • कन्या : शुभ रंग : मरून | अंक : ८

ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी. 

  • तूळ: शुभ रंग : क्रिम | अंक : ६

आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस. 

  • वृश्चिक : शुभ रंग : हिरवा | अंक : ४

आज तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या घटना घडतील. ज्येष्ठ आज मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करावेत.                             

  • धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ५

काही अत्यावश्यक खर्च हात जोडून उभे असतील.बचतीचा विचार आज तरी सोडूनच द्या. घरातील थोर मंडळी उपदेशांचे डोस पाजतील. गप्प राहणे हिताचे. 

  • मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील. 

  • कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७

कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नरंजन सोडून कृतीस प्राधान्य द्याल.

  • मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल.

बातम्या आणखी आहेत...