आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे दरवाजे उघडले जाऊ शकतात

रिलिजन डेस्क

Sep 23,2019 12:25:00 AM IST

सोमवार, 23 सप्टेंबर रोजी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रहस्थितीमुळे वरियान नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना दिवस लाभाचा असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...


मेष : शुभ रंग : पिस्ता | अंक : १
आज सहकाऱ्यांशी मिळून मिसळूनच कामे होतील. अहंकाराची बाधा नको. प्रसंगी विरोधकांनाही चहा पाजणे गरजेचे राहील. शेजाऱ्यांशी सलोखा वाढेल.वृषभ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७
पैशाची कमतरता नसल्याने चैनी व विलासी वृत्ती जोपासता येईल. काही रसिक मंडळी सहकुटुंब सहलीचे बेत आखतील. आज प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील.मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ३
कार्यक्षेत्रात काही हितशत्रूंच्या कारवायांना तोंड द्यावे लागेल. नवीन ओळखीत विश्वास ठेवणे हिताचे नाही.देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. भिडस्तपणा नको.कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ८
आज काही घरेलू प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्याल. काही दूरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. हितसंबंधात सुधारणा होईल. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील.सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
आवक मनाजोगती असली तरी पैशाची उधळपट्टी टाळणे गरजेचे आहे. उद्योग व्यवसायात जाहीरातींवर खर्च करावा लागेल. शेजारी आपलेपणा दाखवतील.कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७
आज घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. गरजुंच्या मदतीस धावून जाल. आज भावंडात मात्र काही क्षुल्लक मतभेद संभवतात.तूळ : शुभ रंग : भगवा | अंक : १
उच्च राहणीमानाकडे तुमचा कल राहील. प्रतिष्ठीतांच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षांना खतपाणी मिळेल. आज विवाहविषयक बोलणी सामंजस्याने पार पडतील.वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ५
नोकरी व्यवसायात चढाओढ वाढली आहे.गुंतवणूक करताना झटपट लाभाचा मोह टाळा. एखाद्या धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वाद टाळा.धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३
अचानक हाती आलेला पैसा तुमची उमेद वाढवेल. व्यवसायात उद्दीष्टे सहज पूर्ण झाल्याने मनावरील काळजीचे सावट दूर होईल. इच्छापूर्ती होईल.मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
नोकरदारांना वरीष्ठांच्या खोचक प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतील. अधिकारांचा गैरवापर टाळा. कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. दैवाची साथ लाभेल.कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
कार्यक्षेत्रात कितीही अडचणी आल्या तरी दैव आज तुमच्याच बजूने आहे. प्रामाणिक प्रयत्न कारणी लागतील. सज्जनांच्या सहवासाने मन प्रसन्न राहील.मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : २
कोणतेही धाडस टाळा. आपल्या सुरक्षेस प्राधान्य देणे गरजेचे आहे. तरूणांनी मर्यादा सांभाळाव्या. नीतीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येईल.

X
COMMENT