आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 25 नोव्हेंबर 2019 ला स्वाती नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

  • मेष: शुभ रंग : मरून | अंक : ६

मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील. 

  • वृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.                                             

  • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १

काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. उच्च राहणी  व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.  

  • कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.                         

  • सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ४

संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. आज भावंडात सामंजस्य राहील.

  • कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : २

कार्यक्षेत्रात मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील.                               

  • तूळ : शुभ रंग : अबोली | अंक : ६

मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी सामंजस्य राहील.                                                                  

  • वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ७

अाज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा.     

  • धनू : शुभ रंग : पिवळा | अंक : ५

वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे करु शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.  

  • मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ९

नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

  • कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.  

  • मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८

आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.

बातम्या आणखी आहेत...