आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Monday 3 February 2020 Daily Horoscope In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक

सोमवार, 3 फेब्रुवारी 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. सोमवारी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : ८

आज तुम्ही स्वत:च्या प्रेमात रहाल. चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. मीच म्हणेन ती पूर्व असे तुमचे धोरण राहील. पूर्वीच्या गुंतवणूकीतून फायदा होईल.

 • वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ९

नवीन व्यावसायिक मंडळींनी मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडेल. आज पत्नी मोलाचे सल्ले देणार आहे.

 • मिथुन : शुभ रंग : केशरी | अंक : ६

कार्यक्षेत्रातील मनाविरुध्द घटना तुम्हाला अस्वस्थ करतील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण गरजेचे राहील. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोत.

 • कर्क : शुभ रंग : तांबडा | अंक : ५

व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका.

 • सिंह : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २

आज मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रातील नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. नोकरदारांना वरीष्ठांचा वरदहस्त लाभेल. आरोग्य साथ देईल.

 • कन्या : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील.

 • तूळ : शुभ रंग : हिरवा | अंक : ३

कंटाळवाणा दिवस. क्षुल्लक कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. गृहीणींना आज शेजारधर्म जपावा लागेल.                                                      

 • वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : १

आर्थिक आवक पुरेशी असून आज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराची खंबीर  साथ राहील.

 • धनू : शुभ रंग : नारिंगी| अंक : ८

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांचे मूड सांभाळणे कठीण होईल. आज जोडीदाराकडूनही फार अपेक्षा न ठेवलेल्या बऱ्या. येणी वसूल होतील.

 • मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ९

सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस.

 • कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ७

आज तुम्हाला काही सज्जनांचा सहवास लाभेल. त्यांच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. अती सडेतोड बोलल्याने आपलीच माणसे दुखावण्याची शक्यता आहे.

 • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल.आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.