आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 23 फेब्रुवारीला श्रवण नक्षत्र असल्यामुळे गंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाचा प्रभाव 7 राशींवर राहील. या योगाच्या प्रभावामुळे कुटुंब आणि स्वतःसाठी काही लोक वेळ काढू शकणार नाहीत. अशुभ योगामुळे वाद, टेन्शन आणि व्यर्थ खर्च होईल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत आणि वेळ वाया जाईल. अशाप्रकारे नोव्हेंबरमधील पहिला सोमवार 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी ठीक राहणार नाही...

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : लाल | अंक : ७
व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : १
थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनाला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील.

कर्क : शुभ रंग : अबोली | अंक : २
ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, परंतू आज पत्नीचा सल्ला डावलू नका.                                                                                              .                                          

सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.   

कन्या : शुभ रंग : तांबूस | अंक : ५
प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर  होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. गर्भवतींना  सुदृढ संततीचा लाभ होईल. कलाकारांचे कौतुक होईल.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ३
भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे  गरजेचे आहे. गृहीणींना  माहेरची ओढ लागेल. 

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ४
रिकामटेकडया चर्चा टाळा कारण त्यातून निष्पंन्न काहीच होणार नाही. आज शेजारी अडचणीत मदत करायला धावून येतील. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शक्यताे.    


धनू :  शुभ रंग : केशरी | अंक
: ६
आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल. 

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ७
व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार  टाळून  हितसंबंध  जपणे  गरजेचे आहे.  

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८ 
आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
आज तुम्ही मित्रमंडळींत आपला मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.   

बातम्या आणखी आहेत...