Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

रिलिजन डेस्क, | Update - Aug 05, 2019, 12:20 AM IST

आज श्रावण मासातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा शुभ योग, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील श्रावणातील पहिला सोमवार

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    सोमवार 5 ऑगस्ट रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. यासोबतच आज श्रावण मासातील पंचमी तिथी आहे. आजच्या दिवशी नागपंचमी सण साजरा केला जातो. आजच्या ग्रहस्थितीमुळे सिद्ध नावाचा शुभ योगही जुळून येत आहे. श्रावण सोमवार आणि नागपंचमी योगामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजच्या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या राशीचे लोक नोकरी आणि बिझनेसमध्ये भाग्यशाली राहतील. सोमवारचे ग्रह-तारे या राशीच्या फेव्हरमध्ये राहतील. या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळेल. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    मेष : शुभ रंग : क्रिम | अंक : १
    आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.  

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : शुभ रंग : शुभ रंग : केशरी | अंक : ३
    आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील. 

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : शुभ रंग : लाल | अंक : २                                                  
    एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल.

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    कर्क :  शुभ रंग : नारिंगी | अंक : ५
    वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना  थकवा जाणवेल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांशी नमते घ्यावेेे. घराबाहेर वाद होतील. 

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : शुभ रंग : हिरवा | अंक : ४
    आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ७                                        
    आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. वैवाहीक जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या.

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
    अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. कलाकारांचा विदेशी नावलौकिक. 

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ५
    आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस अाहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस. 

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    धनू : शुभ रंग : गुलाबी| अंक : ८
    आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    मकर: शुभ रंग : पिस्ता| अंक : २ 
    कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिकच तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. 

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
    आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले तर त्याला म्हणावे तुच जा.  स्वत:च्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या.  

  • monday 5 august 2019 daily horoscope in Marathi

    मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १                                                 
    अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. 

Trending