Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 08, 2019, 12:00 AM IST

12 पैकी 4 राशींसाठी आजचा दिवस चांगला आणि लाभदायक ठरू शकतो.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi
    आज दिनांक 8 एप्रिल विशेष गौरी तृतिया आहे. सोमवारच्या दिवशी सकाळी 7.30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहू काळ राहील. एकूणच 12 पैकी 8 राशींसाठी दिवस सामान्य आणि काहीसा नकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे, आर्थिक व्यवहार करताना आणि कुणाशीही बोलताना सांभाळून राहिलेलेच बरे. तर वृश्चिक आणि मकरसह 4 राशींसाठी आजचा दिवस चांगला आणि लाभदायक ठरू शकतो.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    मेष: शुभ रंग: तांबडा | अंक: ८
    आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत. मौल्यवान ऐवज सांभाळा.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    वृषभ: शुभरंग: जांभळा | अंक: ६
    महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतरच करावेत. काही हरवले असल्यास गवसेल. आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास करून चालणार नाही.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    मिथुन: शुभ रंग: नारिंगी | अंक: ७
    तब्येत ठणठणीत राहील. मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाणार आहात.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    कर्क:  शुभ रंग: पांढरा | अंक: ९
    नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ मनाला दिलासा देतील. विरोधकांचा जोर आता कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    सिंह: शुभ रंग: गुलाबी | अंक: ३
    दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    कन्या: शुभ रंग: मोरपंखी | अंक: ५
    आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    तूळ: शुभ रंग: मोतिया | अंक: ४
    तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर मात्र थोडीफार अस्वस्थता जाणवेल. आर्थिक व्यवहार दुपारपूर्वी उरका.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    वृश्चिक: शुभ रंग: केशरी | अंक: १
    शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    धनू:  शुभ रंग: पांढरा | अंक: ३
    उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ  आहे. झटपट लाभाचा मोह टाळायला हवा. नोकरदारांना साहेबांच्या लहरी सांभाळाव्या लागतील. पत्नीच्याही लहरी सांभाळाल.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    मकर: शुभ रंग: डाळिंबी  | अंक: २
    कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञाधारकपणे वागतील. एकतर्फी प्रेमाला समोरुन होकार मिळेल.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    कुंभ: शुभ रंग: मरून  | अंक: ९
    कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. प्रवासात काही नवे हितसंबंध निर्माण होतील. आज घरचे सोडून लष्कराच्या भाकऱ्या भाजाल.

  • Monday 8 April 2019 daily horoscope in marathi

    मीन: शुभ रंग: सोनेरी | अंक: ६
    आज महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. दुपारनंतर थोडी मानसिक अस्वस्थता राहील. महत्वाची काही मेल्स येणार आहेत. अचानक प्रवास घडतील.

Trending