आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 8 डिसेंबरचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. भरणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. 

येथे जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...

  • मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : ४

मनोबल उत्तम राहील. आकर्षक पेहरावात घराबाहेर पडाल. एखाद्या समारंभात आत्मविश्वासाने वावराल. महत्वपूर्ण चर्चेत आपले मत परखडपणे मांडाल. 

  • वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ३

अनावश्यक खर्चास  लगाम घालून भविष्यासाठी गुंतवणूक करण्याकडे आज तुमचा कल राहील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेजच्या नोकरीच्या संधी येतील.                                                          

  • मिथुन : शुभ रंग : अबोली | अंक : २

पूर्वी केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नोकरीधंद्यातील अनुकूलता वाढेल.  दुरावलेले नातेसंबंध जवळ येतील. अनपेक्षित लाभ होतील. 

  • कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ८

कार्यक्षेत्रात आपले महत्व सिध्द करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक जिवनांत तुमच्या शब्दाला मान राहील. कामाच्या व्यापात प्रश्नांकडे  दुर्लक्ष होईल.                                

  • सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ९

काही क्षुल्लक कामातही अडचणींचे डोंगर उभे राहतील. मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता. नोकरदारांना अधिकारी खोटी अश्वासने देतील. 

  • कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

व्यवसयाची गती संथ राहील. सर्वच आर्थिक व्यवहार सावधगिरीने करणे गरजेचे आहे. विश्वासातल्या माणसाकडूनच विश्वासघात होण्याची शक्यता आहेे. 

  • तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४

एखाद्या शुभ कार्यात  सहभागी व्हाल. आज घरात पाहूण्यांची वर्दळ वाढेल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल. प्रवासात खोळंबा होऊ शकतो. मूर्खांशी वाद टाळा. 

  • वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

महत्वाची कामे  रेंगाळतील. भिडस्तपणाने न झेेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकाराल. काम कमी व धावपळ जास्त होईल. आज आरोग्याबाबत निष्काळजीपणा नको. 

  • धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ६

जिवलग मित्रांच्या सहवासात काही जुन्या गमती जमतींना उजाळा द्याल. प्रिय व्यक्तीसोबत एखाद्या रोमँटीक चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस. 

  • मकर : शुभ रंग : मरून | अंक : २

वाहन खरेदीसाठी  कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. प्रॉपर्टी विषयी रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील.  प्रेम प्रकरणात नसती अाफत होईल.

  • कुंभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : १

उद्योग व्यवसायात आपल्या कुवती बाहेर आर्थिक उलाढाली नकोत. पारिवारीक जिवनातील काही समस्या सोडवाव्या लागतील. व्यस्त दिवस. आज वाद टाळा.

  • मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

धनप्राप्तीचे विविध मार्ग खुले होतील. उच्च रहाणी व उच्च विचारसरणी असेच तुमचे धोरण राहील. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे तुम्हाला छान जमेल. वाद टाळा.

बातम्या आणखी आहेत...