आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फायदा घेण्याची एकही संधी सोडत नाहीये. याच प्रयत्नांत भाजपाने पक्षाकरता निधी गोळा करण्यासाठी मोदींचा आधार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी नमो अॅपमध्ये डोनेशन फीजर समाविष्ट केले आहे. याद्वारे भाजपाला 5 ते 1000 रूपयांपर्यंत निधी देता येणार आहे. या डोनेशनद्वारे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची संधी मिळणार आहे.
मोदींना भेटण्यासाठी ही आहे प्रक्रिया
> यासाठी तुम्हाला आपल्या फोनमध्ये नमो अॅप इंस्टॉल करावे लागणार आहे. Google Play Store वरून हे अॅप घेता येते. यानंतर नमो अॅपच्या डोनेशन फीचर मधून आपल्या इच्छेप्रमाणे 5 ते 1000 रूपयांपर्यंतचा निधी जमा करावा लागणार आहे. डोनेशन केल्यानंतर एक रेफरल कोड तयार होईल. व्हाट्सअॅप, ई-मेल किंवा एसएमएसद्वारे 100 लोकांना हो कोड सेंड करावा लागणार आहे. 100 लोकांनी रेफरल कोडचा वापर करत संबंधित अॅपने डोनेशन दिल्यास आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळू शकते.
पुढे वाचा.. फ्रीमध्ये मिळणार नमो टी-शर्ट आणि कॉफी मग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.