आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर- बँकेतून काढून दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले पैसे चोरट्यांनी शिताफीने पळवल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी लातूर शहरामध्ये घडला. पोलिस कायम डिक्कीत पैसे ठेवू नका, असे आवाहन करत असतात. विशेष म्हणजे यात ज्यांचे पैसे गेले ते पोलिस दलातच कार्यरत आहेत.
लातूर शहरातील गांधी चौक पोलिस ठाण्यात कार्यरत जेजेराव आनंदराव पवार यांनी औसा रोडवरील अॅक्सिस बँकेतून मुलाच्या शिक्षणासाठी एक लाख रुपये काढले. पैसे दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले व तेथून ते रेणापूर नाक्यावरील एलआयसी कार्यालयामध्ये बाँड व काही कागदपत्रे घेण्यासाठी गेले. तेथील काम उरकून ते बाहेर आले असता दुचाकी पंक्चर झालेली दिसली. तेथून त्यांनी दुचाकी ढकलत पंक्चर काढण्यासाठी मशिदीसमोर असलेल्या दुकानात आणली. तेथे त्यांनी पंक्चर काढताना डिक्की काढून बघितली असता त्यात त्यांनी ठेवलेले एक लाख रुपये गायब असल्याचे आढळले. रात्री उशिरा याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.