Home | Business | Business Special | Money tips : How can earn in part time

साइड इनकमसाठी अमलात आणा या पद्धती, होईल चांगली कमाई...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 02:25 PM IST

2 ते 4 तास काम करून होईल एक्सट्रा इनकम

 • Money tips : How can earn in part time

  नवी दिल्ली- तुम्ही तुमच्या चालु असलेल्या कमाईवर नाखुष असाल आणि एक्स्ट्रा इनकम कमवण्याचा विचार करत असाल तर या काही टिप्सचा वापर तुम्ही करू शकता. या साइड इनकमने तुमच्या अनेक अडचणी दुर होऊ शकतात पण आधी चेक करून घ्या की तुमची कंपनी या पद्धतीच्या साइड इनकमची परवानगी देते का नाही. जाणून घ्या अशा 4 टिप्सबद्दल

  1 सोशल अकाउंटचा करा वापर

  - इंस्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन किंवा ट्वीटरवर तुमचे खुप फॉलोअर्स आहेत आणि त्यांच्यावर तुमचा खुप प्रभाव असेल तर तुम्ही फॅशन, कॉस्मेटिक्स, लाइफस्टाइल आणि फूड ब्रांड सारख्या कंपन्यासोबत संपर्क साधा. यातुन तुम्हाला चांगली कमाई होईल.

  किती होईल इनकम


  - जर इंस्टाग्रामवर तुमचे 20 हजार फॉलोअर आहेत तर एखादा ब्रँड तुम्हाला त्यांचे जाहिरात करण्यासाठी 5 हजार रूपयांपर्यंत देऊ शकतात, जर तुमच्या फॉलोअर्सची संख्या 50 हजार ते 1 लाखांच्या घारात असेल तर तुम्हाला 20 ते 30 हजार मिळू शकतात आणि तुमच्या फॉलोअर्सची संख्या 5 लाख किंवा जास्त असेल तर तुम्हाला 1 लाखांपेक्षा जास्त मिळू शकतात.

  2 ऑनलाइन शिकवून कमाई

  - टीमव्यूअर किंवा स्काइप सारख्या सॉफ्टवेअरच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन ट्यूशन देऊ शकता. कुठेही बसून विद्यार्थ्यी किंवा त्यांचे पॅरेंट्स तुमच्याशी संपर्क करून ऑनलाइन ट्यूशन घऊ शकतात. आठवड्यात फक्त 8 ते 12 तास काम करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

  किती होईल इनकम


  - जर तुम्ही प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना शिकवले तर तुम्हाला 500 ते 700 रूपये प्रति तास मिळू शकतो आणि जर एखादा विदेशी विद्यार्थी तुमच्याकडून ट्यूशन घेतो तर तुम्हाला एका तासाचे 10 डॉलरपर्यंत मिळू शकतो. जर तुम्ही हाय स्कूलच्या मुलांसाठी गणित, फिजिक्स, कंप्यूटर सायस सारख्या विषयांची ट्यूशन सुरू केली तर, त्यासाठी तुम्हाला 500-1000 रुपये प्रति तास मिळू शकते आणि जर विद्यार्थी विदेशी असेल तर 25ते30 डॉलर मिळू शकतात.

  3 व्हिजिटींग फॅकल्टी बनून कमाई

  - तुम्ही एखाद्या विषयाचे एक्सपर्ट असाल आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात आवड असेल तर कॉलेज, मॅनेजमेंट, इंजीनियरिंग अशा कोणत्याही कॉलेजमध्ये व्हितिटींग फॅक्ल्टी बनू शकता.

  किती होईल कमाई


  - येथे तुमच्या बूद्धीमत्तेवर आणि त्या संस्थेवर अवलंबून आहे. जर तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेत शिकवायला गेलात तर तुम्ही एका सेमिस्टरचे 4 लाखांपर्यंत मिळू शकतेत. जर संस्था छोटी असेल तर 700 ते 800 रूपये प्रति लेक्चर मिळू शकतात.


  कंटेंट राइटिंगने कमाई

  -तुम्हाला ज्या विषयात आवड आहे त्या विषयांवर लेख लिहून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अनेक वेबसाइट, कंपन्या किंवा शिक्षण संस्थांसाठी तुम्ही कंटेंट रायटिंगचे काम करू शकता. यात तुमच्या शब्दानुसार तुम्हाला पेमेंट मिळते.

  कितनी होगी इनकम


  - कमाई तुमच्या लोकप्रियतेवर आणि कोणत्या विषयाबद्दल लिहीत आहात त्यावर पेमेंट अवलंबून आहे. तुमच्या शब्दांना मागणी असेल तर तुम्हाला 5 ते 7 रूपये प्रति शब्द मिळू शकतात.

Trending