आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये बसून रात्री 3 वाजता सिस्टीममध्ये घुसला हॅकर, 10 मिनिटांत मारला 4 कोटींवर डल्ला, यामुळे वाचली उर्वरीत रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


रायपूर - ब्रिटनमध्ये बसलेल्या हॅकरने यस बँकेच्या व्यावसायिक खात्यावर डिजिटल दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हॅकरने रात्री 3 वाजता अवघ्या 10 मिनिटांत 4 कोटींवर डल्ला मारला. तसेच संपूर्ण रक्कम टप्प्या-टप्प्याने वेग-वेगळ्या खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात केली. 

 

बँकेच्या आधिकाऱ्यांनी सकाळी 9:30 वाजता पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तोपर्यंत फक्त अडिच कोटी ट्रान्सफर झाले होते. पोलिसांनी लगेच ट्रांझेक्शन थांबवले. त्यामुळे उर्वरित रक्कम वाचली आहे. पोलिसांनी अंदाजिच 2 कोटी 20 लाख रूपये परत मिळवले. पण उरलेली 27 लाखांची रक्कम मिळवता आली नाही.

 

पोलिसांनी लल्लन सिंग या आरोपीला दिल्लीतून अटक केली. चौकशी केल्यावर कळाले की, हॅकर हा एनआरआय आहे. तो ब्रिटनमध्ये राहत असून त्याने तेथूनच खाते हॅक केले आहेत. ऑनलाइन पैशांचे ट्रान्सफर करण्यासाठी त्याने मुंबई आणि दिल्लीत आपले जाळे पसरवले आहेत. मोठ्या कमिशनवर तो खाते भाड्याने घेतो. पोलिसांना हे कळाले की, को भारतात कधी-कधी आला आणि त्याचे लोकेशन कुठे आहे. त्याच्या आणखी काही सहकाऱ्यांची माहिती मिळाली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

 

खाते उपलब्ध करून देतो लल्लन 
दिल्लीतून अटक करण्यात आलेला लल्लन सिंग ब्रिटनच्या हॅकरला 20 टक्के कमिशनवर खाते उपलब्ध करून देतो. पोलिसांना कळाले, की  26 खाते हॅकरला लल्लनने उपलब्ध करून दिले. त्याचे स्वत: चे 4 खाते आहेत. 7 नोव्हेंबरला त्याच्या खात्यात पैसे ट्रांसफर होताच काही तासात त्याने 1 लाख 10 हजार रुपये काढले. आधिकाऱ्यांनी सांगितले की, एटीएममधून पैसे काढण्याची लिमिट 40 हजार असली तरी, ट्रांसफर करण्याची लिमिट नाही. लल्लनने त्याच्या खात्यातून 40 हजार काढले, त्यानंतर वेगवेगळ्या खात्यात 70 हजार ट्रांसफर केले. एटिएम फुटेज आणि बँकेचे ट्रांझॅक्शन पाहून लल्लनचा शोध घेण्यात आला.
 
सुट्टीचा दिवस निवडला म्हणजे कुणाला कळू नये
पोलिसांच्या समोर जी प्लानिंग आली आहे, त्याच्या खुलास्यानंतर आधिकारी पण हैरान आहेत. डीएसपी क्राइम अभिषेक महेश्वरी यांनी सांगितले की, हॅकरने खुप तगडि प्लानिंग केली होती. त्याने आधीच 26 खाते तयार ठेवले, ज्यात पैसे ट्रांसफर झाले. त्यानंतर 7 नोव्हेंबर हा दिवस निवडला कारण त्यानंतर 3 दिवस सुट्टी होती. कोणाला कळू नये म्हणून रात्री 3 वाजता सिस्टीम हॅक करण्यात आली. पुढे 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला सुट्टी होती, त्यादरम्यान हे पैसे वेगवेगळ्या खात्यात ट्रांसफर केले. ते पैसे विदेशातील खात्यात ट्रांसफर करण्याच्या आधीच बँकेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले आणि उरलेले पैसे वाचवता आले.

बातम्या आणखी आहेत...