आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: मृत्यूच्या 80 वर्षांनीही जिवंत माणसासारखी आहे या बौद्ध भिक्षूंची डेडबॉडी, स्किन, केस आणि नखे सर्व आहे शाबूत, शरीरातून येतो सुगंध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - मृत्यूच्या 80 वर्षांनंतरही रशियन बौद्ध भिक्षूचे शरीर अशा अवस्थेत आहे, जणू काही त्यांचा 36 तासांपूर्वीच मृत्यू झाला असावा. त्यांच्या शरीराला आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले नाही. डेडबॉडीला कबरीतून आतापर्यंत 3 वेळा बाहेर काढण्यात आलेले आहे, परंतु अजूनही ती जशास तशी आहे. जेव्हा शास्त्रज्ञांना रिसर्चसाठी बोलावण्यात आले तेव्हा तेही हे पाहून हैराण झाले. शास्त्रज्ञ म्हणतात, बॉडी पाहून असे वाटते की, ती खूप चांगल्या प्रकारे प्रिझर्व्ह करण्यात आली असावी. त्यांची स्किन ते केस आणि नखे सर्वकाही जिवंत माणसांसारखेच आहेत.


तीन वेळा काढण्यात आली बॉडी
- बौद्ध भिक्षू दाशी दोरजो इतिजेलोव यांचा 1927 मध्ये मृत्यू झाला होता. मृत्यूआधी त्यांनी आपल्या अनुयायांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली. ज्यात त्यांनी आपला मृतदेह कबरीतून बाहेर काढण्याची तारीख लिहली होती.
- भिक्षूंनी सांगितलेल्या तारखेनुसार, त्यांच्या मृत्यूच्या 48 वर्षांनंतर 1955 मध्ये त्यांचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात आला. परंतु एवढ्या वर्षांनंतरही त्यांच्या शरीराला कोणतेही नुकसान झालेले नाही. 
- यांनतर 22 वर्षांनी 1973 मध्ये आणि पुन्हा मग सन 2002 मध्ये त्यांची मृतदेह बाहेर काढण्यात आला, परंतु त्यांचे शरीर आपल्या वास्तविक रूपातच होते. कोणत्याही अवयवाचे नुकसान झालेले नव्हते.
- या चमत्कारानंतर भिक्षूंनी यावर रिसर्चसाठी वैज्ञानिकांना बोलावले. वैज्ञानिकही हे पाहून हैराण झाले. बॉडी पाहून वाटत होते की, ही जशी खूप चांगल्या प्रकारे प्रिझर्व्ह करून ठेवण्यात आलेली आहे. तथापि, त्यांचे ममीफिकेशन करण्यात आलेले नव्हते.
- बौद्ध भिक्षूची ही चमत्कारिक बॉडी बुरतियाच्या इवोल्गिन बौद्ध मॉनेस्ट्रीमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आणि बौद्ध भिक्षूंसाठी ती पवित्र प्रतीक बनलेले आहे.

 

वैज्ञानिक म्हणतात- जणूकाही 36 तासांपूर्वीच झाला आहे मृत्यू
- रशियाच्या स्टेट युनिव्हर्सिटीत हिस्ट्रीचे प्रोफेसर गलिना येरशोवा म्हणाले की, डेडबॉडीला दफन केल्यानंतर 75 वर्षांनी जेव्हा ती बाहेर काढण्यात आली, तेव्हा त्यांची स्किन, केस आणि नखे सर्वकाही पहिल्यासारखेच होते.
- बौद्ध भिक्षूच्या सांध्यांमध्ये तसाच लवचिकपणा होता आणि हातापायांच्या टिश्यूतही जिवंत व्यक्तीच्या शरीरासारखाच लवचिकपणा होता. दुसरीकडे, त्यांच्या शरीरातून दुर्गंधी येण्याऐवजी एक सुगंध येत होता.
- 2002 मध्ये बॉडीचे परीक्षण करणाऱ्या वैज्ञानिकांनी आपल्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये सांगितले की, बौद्ध भिक्षूची बॉडी या कंडिशनमध्ये आहे की, जणू काही त्यांचा मृत्यू 36 तासांपूर्वीच झाला आहे.

 

आधी पाहिली नाही अशी बॉडी
- फेडरल सेंटर ऑफ फॉरेंसिक मेडिसिनचे प्रोफेसर व्हिक्टर म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी प्रॅक्टिसमध्ये मी प्रिझर्व्ह न केलेली अशी बॉडी कधीही पाहिलेली नाही.
- ते म्हणाले की, 2 कंडिशनमध्येच बॉडी एवढ्या चांगल्या अवस्थेत मिळते. एक जेव्हा ती ममीफाइड केलेली असेल. किंवा एखाद्या खूप थंड वातावरणात ठेवलेली असेल.
- शास्त्रज्ञांच्या मते, भिक्षूच्या बॉडीच्या प्रोटीन स्ट्रक्चरला जराही नुकसान झालेले नाही. ती अजूनही एखाद्या जिवंत माणसासारखी दिसत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, आणखी Photos...  

 

 

बातम्या आणखी आहेत...