आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसाचे पाय पकडून खायला मागत असलेल्या माकडाचा फोटो व्हायरल, डोळ्यात दिसतीय पापी पोटाची निर्दयता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल डेस्क - आता पुन्हा एकदा फेसबुक वर डोळ्यात पाणी आणणारा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोला बघितल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल. फेसबुकवरील Shayari....khamosiyo ke Alfaz या पेजवर 15 नोव्हेंबर रोजी साहिल शर्मा या युझरने एका माकडाचा फोटो पोस्ट केला होता. साहिलने या फोटोच्या कॅपशनमध्ये लिहीले आहे, "मैं भी भूखा हूँ कुछ मुझे भी दे दो, जुबान ही नहीं है.....पेट तो मेरा भी है". साहिलने लिहीलेल्या कॅपशनमध्ये माकड त्याचे दु:ख सांगत असल्याचे जाणवत आहे. 

 

फोटोमध्ये माकडाने एका व्यक्तीच्या पायाला दोन्ही हातांनी पकडलेले आहे आणि त्याच्या डोळ्यात पापी पोटाच्या निर्दयेता दिसत आहे. याशिवाय फोटोमध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या हातात ब्रेड दिसत आहे. फोटोतील माकडाकडे पाहून असे वाटते की, त्याला खूप भूक लागली असून तो काहीतरी खाण्यासाठी मागत आहे. आम्ही या फोटोचे सत्य सांगत नाहीये. हा फोटो सोशल मिडीयावरील व्हायरल पोस्ट आहे ज्यावर तीन हजार पेक्षा जास्त लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

आपल्या घरात जेवण झाल्यावर बऱ्यापैकी शिल्लक राहिलेले अन्न आपण फेकून देतो. भूतलावर सर्व प्राण्यांमध्ये मानवाला सर्वांत बुद्धीमान प्राणी समजले जाते. त्यामुळे आपण आपल्या अन्नाची व्यवस्था करू शकतो. पण शहरांमध्ये उदरर्निर्वाह करणाऱ्या प्राण्यांना त्यांच्या अन्नासाठी वणवण भटकावे लागते. बऱ्याचवेळा प्रयत्न करूनही त्यांची अन्नाची व्यवस्था होत नाही आणि लाखो पशु-पक्षी न खाता-पीता झोपी जातात. त्यामुळे आपण आपल्या घरातील अन्नापैकी थोडेसे अन्न प्राण्यांना द्या. जेणेकरून प्राणी देखील माणसांप्रमाणे त्यांची भूख भागवू शकतील.    

बातम्या आणखी आहेत...