आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माकडाला हवा होता 4 महिन्यांच्या चिमुरडा, लोकांनी केले एवढे प्रयत्न पण त्याने काही केल्या सोडले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमधील एका गावातील एक रंजक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका माकडाने 4 महिन्यांच्या एका चिमुरड्याला पकडले. या माकलाला त्या मुलाला बरोबर न्यायचे होते. त्यामुळे ते माकड मुलाला सोडायला तयार नव्हते. मुलाच्या आईने बरेच प्रयत्न केले पण माकड तिच्यावर हल्ला करत होते. बऱ्याच प्रयत्नानंतर लोकांनी माकडाला फसवून अथक प्रयत्नानंतर मुलाला सोडवले. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
व्हिडिओमध्ये माकड मुलाच्या छातीवर हात ठेवून बसल्याचे दिसत आहे. जवळच बसलेली महिला मुलाला उचलण्याचा प्रयत्न करते तेव्हा माकड तिच्यावरच हल्ला करते. लोकांनीया माकडाला खाण्याच्या पदार्थांचे आमीष दाखवले तरी ते बाळाला सोडायला तयार नव्हते. त्यानंतर एका व्यक्तीने माकडाचे लक्ष दुसरीकडे वेधले आणि दुसरा व्यक्ती माकडाला उचलून घेऊन गेला. 

 

 

बातम्या आणखी आहेत...