आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तण नाशकांमुळे झाला Cancer; खत कंपनीला 2000 कोटी रुपयांचा दंड, US कोर्टाचे आदेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - कॅलिफोर्नियात तण नाशकांमुळे कर्करोग झालेल्या एका व्यक्तीला खत आणि औषध कंपनीकडून 2000 कोटी रुपयांची (28.9 कोटी डॉलर) नुकसान भरपाई मिळणार आहे. कॅलिफोर्निया हायकोर्टाने फर्टिलायझर कंपनी मॉनसॅन्टा विरोधात हा निकाल दिला आहे. ड्वेन जॉन्सन एका मैदानाची देखभाल करण्याचे काम करत होते. त्यांना तण नाशकांच्या फवारणीतूनच कर्करोग झाला असे न्यायालयात स्पष्ट झाले आहे. ड्वेन यांच्या विजयामुळे या औषध आणि खतांचे पीडित असलेल्या शेकडो लोकांना मोठा दिलासा मिळेल. ते सुद्धा या कंपनीच्या विरोधात आवाज उठवतील असे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.


मॉनसॅन्टा तण नाशक कंपन्यांच्या फवारणीमुळे शेकडो शेतकरी आणि कामगारांना कर्करोग झाला. परंतु, ड्वेन जॉन्सन यांची प्रकृती सर्वात गंभीर असल्याने कोर्टाने त्यांच्या तक्रारीची सुनावणी आधी घेण्याचा निर्णय घेतला. 46 वर्षीय जॉनसन एका मैदानात ग्राउंड्सकीपर म्हणून कार्यरत होते. मैदानावरील गवताची काळजी घेण्यासाठी त्यांनी तण नाशकांचा वापर केला होता. आता कॅलिफोर्नियातील इतर पीडितांच्या खटल्यांवर सुनावणी घेतली जाणार आहे. अमेरिकेतील न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, या कंपनीच्या तण नाशकातून आतापर्यंत 800 हून अधिक लोकांनी कर्करोग झाल्याचा दावा केला आहे. 


कंपनीचे अधिकारी म्हणतात...
कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर मॉनसेन्टा कंपनीचे उपाध्यक्ष स्कॉट पॉन्टिंग यांनी आपले प्रॉडक्ट सुरक्षित असल्याचा दावा केला. ते म्हणाले, "आमच्या रसायनांमुळे कर्करोग होऊ शकत नाही. आम्ही हायकोर्टाच्या या निर्णयाच्या सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहोत." तर दुसरीकडे, पीडित जॉन्सन यांनी सांगितल्याप्रमाणे, कंपनी सुप्रीम कोर्टात गेल्यास यात त्यांचे नुकसान आहे. कारण, पीडिताला नुकसान झाल्यास कंपनीला त्या बदल्यात दरवर्षी 173 कोटी रुपये असा अतिरिक्त दंड द्यावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...