Home | National | Delhi | Monsoon deflects country for four days, but rain decreases 17 percent; Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Odisha still wait for rain

चार दिवस विलंबाने मान्सूनने देश पादाक्रांत केला, पण पाऊस १७ टक्के कमी; राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 21, 2019, 08:44 AM IST

मान्सूनने एक जूनऐवजी एक आठवड्याने म्हणजे ८ जून रोजी प्रवेश केला होता

 • Monsoon deflects country for four days, but rain decreases 17 percent; Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Odisha still wait for rain

  नवी दिल्ली-मान्सूनने चार दिवसांच्या विलंबाने का होईना संपूर्ण देशाला पादाक्रांत केले. विलंबामुळे पाऊस १७ टक्के कमी झाला. सामान्यपणे १५ जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देशभरात पोहोचतो. केरळमध्ये सर्वात आधी दाखल झाल्यानंतर मान्सून पश्चिम राजस्थानात पोहोचला. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार गेेल्या चोवीस तासांत पश्चिम राजस्थानात चांगला पाऊस झाला.

  याबरोबरच मान्सूनच्या पावसाने देश व्यापला. यंदा मान्सूनने एक जूनऐवजी एक आठवड्याने म्हणजे ८ जून रोजी प्रवेश केला होता. महाराष्ट्रातील मुंबईतही यंदा मान्सून २५जून रोजी पोहोचला. दिल्लीत ५जुलै रोजी मान्सूनचा पाऊस झाला होता. लवकरच पूर्व राजस्थान, कर्नाटक, अंदमान-निकाेबार, गुजरात, आंध्र किनारपट्टी, तेलंगणा, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्र, तमिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. गाेव्यातही आगामी चार दिवसांत पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे मासेमारांनी सागरी भागात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. कोकण, गोव्यात सरासरीहून १६ टक्के जास्त पाऊस झाला. सौराष्ट्र, कच्छ, दिल्ली, प्रदेशासह पश्चिम बंगालमध्ये ५० टक्क्यांहून कमी पाऊस झाला. मुंबई, आसाम, पूर्व उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने पूर आला.


  गेल्या आठवड्यात ५ राज्यांत मुसळधार पाऊस

  आसाम, बिहारमध्ये दुप्पट पाऊस, पंजाबात १६२ टक्क्यांहून जास्त, ३ राज्यांत दुष्काळ
  बिहारमध्ये या आठवड्यात १७० मिमी पाऊस झाला. तो सरासरीहून कमी होता. ९० मिमी अपेक्षित असून ८८ टक्के झाला. आसामसह ईशान्येकडील राज्यांत लोकांना पुराचा सामना करावा लागला. आसाममध्ये २२१ मिमी पाऊस झाला. अपेक्षित ११७ मिमी हाेता. बिहार व आसाममध्ये पुरामुळे १.२५ कोटी लोकांना फटका बसला. बिहारमध्ये सुमारे १०० व आसामात पुरामुळे ४७ जणांचा मृत्यू झाला. पश्चिम उत्तर प्रदेशात सरासरी, पूर्व यूपीत मुसळधार पावसाची नोंद झाली. पश्चिम यूपीत ७३ मिमी पाऊस झाला. अर्थात आठवड्यात २२ टक्के कमी पाऊस झाला. पंजाबमध्ये १६२ टक्क्यांहून जास्त अर्थात ११६ मिमी पावसाची नोंद झाली. तो सरासरीच्या ४४ मिमीपेक्षा दुप्पट झाला. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशातही खूप कमी पाऊस झाला.


  दिल्ली, केरळ, तेलंगण व आंध्रात रेड अलर्ट
  मान्सून आधी हिमालयाच्या बाजूने चांगला पाऊस शक्य आहे. आता त्याचा दक्षिणेकडे रोख असून केरळ, कर्नाटकातील काही भाग, आंध्रची किनारपट्टी, तेलंगणात मुसधार पाऊस होऊ शकतो. केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटकात आगामी तीन दिवसांत सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाबमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


  मुझफ्फरपूर : रस्त्यावर घर कांटी भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे दुभाजक पूरग्रस्तांचा नवा निवारा ठरला आहे. लोक तेथे राहू लागले आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बुढी गंडक नदीने धोक्याची पातळी ११ सेंमीने ओलांडली आहे. त्यामुळे नदीचा तीर तसेच परिसर पाण्यात बुडाला आहे. कांटी भागातील मुस्तफापूर येथे पाच गावांतील लोकांनी चौपदरी मार्गाच्या एका भागावर डेरा टाकला आहे. दुसरे छायाचित्र एनएच-५७ चे आहे. विठनसराय गावात शाळा महामार्गावरच सुरू झाली आहे.

 • Monsoon deflects country for four days, but rain decreases 17 percent; Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh, Odisha still wait for rain

Trending