Monsoon / दोन महिन्यांपूर्वीच तापमानात वाढ, पूर्वमोसमी हंगामात कमी पाऊस त्यामुळे मान्सूनला विलंब; मात्र हे कमी पावसाचे संंकेत नव्हेत

महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर

त्तर-मध्य भारतात उष्णतेची लाट; यंदा देशात १५ जूनपर्यंत तापमान चढेच राहणार 

दिव्य मराठी नेटवर्क

May 28,2019 11:01:00 AM IST

नवी दिल्ली/पुणे - मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात पोहोचला आहे. मात्र तो निश्चित वेळेच्या ६ दिवस उशिरा केरळला पोहोचण्याची अपेक्षा आहे. तो ६ जूनला केरळच्या किनाऱ्यावरून भारतात प्रवेश करेल. हवामान विभागाच्या मते यंदा पाऊस सरासरीएवढा राहील. सध्या देशाचा ४८% भाग दुष्काळाच्या तडाख्यात आहे. त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जिल्हे असे आहेत जिथे सतत पाच वर्षे दुष्काळ आहे. हा हंगाम अनिश्चित आहे. अल-निनो मान्सूनच्या पॅटर्नला नुकसान पोहोचवू शकतो. दिव्य मराठीने भारतीय हवामान विभागातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डी. एस. पई यांच्याशी चर्चा केली आणि त्याचबरोबर मान्सूनच्या विलंबाचे कारण काय हे स्कायमेटच्या अहवालाचा अभ्यास करून जाणून घेतले. विलंबाची तीन प्रमुख कारणे समोर आली आहेत. एक-प्री मान्सूनमध्ये २३% कमी पाऊस होणे, दुसरे-मेपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सचे अस्तित्व. आणि तिसरे कारण बंगालच्या उपसागरात पूर्वमोसमीच्या संकेतांना १२ दिवसांचा उशीर. आयएमडीनुसार जूनपर्यंत तापमान चढेच राहील. उत्तर आणि दक्षिण भारताच्या तुलनेत मध्य भारताला अपेक्षेपेक्षा जास्त तापमानाचा सामना करावा लागत आहे.

२०१४ ते १६ दरम्यान मान्सूनला विलंब, पण तिन्ही वर्षी झाला सरासरीएवढा पाऊस

मान्सून उशिरा येणे म्हणजे कमी पाऊस नाही. २०१४,२०१५ आणि २०१६ या तीन वर्षी सतत मान्सून उशिरा आला होता. पण पाऊस सामान्य होता. वेस्टर्न डिस्टर्बन्स कायम राहिल्याने आता जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत उष्णता कायम राहील. तेलंगण, आंध्र, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ,गुजरात, राजस्थान, यूपीच्या अनेक भागांत उष्णतेची लाट राहील. पारा २ अंश जास्त राहील.

६ वर्षांचे आकडे
वर्ष मान्सून आगमन पाऊस
2014 5 जून 88%
2015 6 जून 86%
2016 8 जून 97%
2017 30 मे 95%
2018 29 मे 91%

मान्सूनला विलंबाची तीन कारणे व त्याचे परिणाम...

प्री मान्सून: बंगालच्या खाडीत १२ दिवसांचा उशीर

पूर्वमोसमी हंगामात १ मार्च ते २३ मेपर्यंत ११०.९ मिमी पाऊस अपेक्षित होता. परंतु ८५.२ मिमी झाला. हे प्रमाण २३% नी कमी आहे. पूर्वमोसमी पावसाला ‘प्री मान्सून रेन पीक’ असे म्हटले जाते. २१-२२ एप्रिलपासून बंगालच्या खाडीत त्याचे संकेत दिसतात. यंदा १० ते १२ दिवस विलंब झाला.त्यामुळे मान्सूनला विलंब हाेऊ शकताे.

तापलेला जानेवारी: सरासरीपेक्षा ३ अंश जास्त

यंदा जानेवारीपासूनच उष्णता वाढली हाेती. दिल्ली, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये जानेवारीतच तापमान ३० ते ३५ अंशांवर पाेहाेचले हाेते. ते सरासरीहून २ ते ३ अंशांनी जास्त. हीच स्थिती एप्रिल-मे मध्ये दिसली. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात एप्रिल व मेमध्ये तापमान ४० अंशांवर गेले .

वेस्टर्न डिस्टर्बन्स: पावसात अडथळा
सामान्यपणे वेस्टर्न डिस्टर्बन्स डिसेंबरमध्ये तयार हाेतो. डिसेंबरमध्ये पाऊस पडताे. यंदा डिसेंबरमध्ये तसे दिसले नाही. नैऋत्य माेसमी पावसाच्या वाटचालीतही अडथळा निर्माण हाेत आहे. ११ ते १५ मे दरम्यान दाेन वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसून आले. या स्थितीमुळे मान्सूनच्या प्रगतीला अडथळे येत आहेत.

हीट वेव्ह | १९९० च्या दशकात सरासरी ५८० लाटा, आता वर्षाकाठी ६७० हून जास्त

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेनुसार, उष्णता व थंडीच्या लाटांचे प्रमाण वाढले. १९९० पर्यंत उष्णतेच्या लाटेच्या घटना दरवर्षी ५०० पेक्षा कमी होत्या. १९९१ ते २००० च्या दशकात ५८० तर २००० ते २०१० दरम्यान दरवर्षी ६७० घटना झाल्या. २०१७ मध्ये ६५० मृत्यू झाले.

X
महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावरमहाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर
COMMENT