आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Monsoon Returns Again ... One Week Later Simultaneously Rain More Than 12 States , Warning For 15 States

मान्सून पुन्हा परतला... एक आठवड्यानंतर १२ हून जास्त राज्यांत एकाच वेळी पाऊस, १५ राज्यात सतर्कतेचा इशारा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र आसामच्या बरपेटा जिल्ह्यातील ओटा गावाचे आहे. गावाला पाण्याने वेढा घातला आहे. - Divya Marathi
छायाचित्र आसामच्या बरपेटा जिल्ह्यातील ओटा गावाचे आहे. गावाला पाण्याने वेढा घातला आहे.

नवी दिल्ली  - एक आठवड्याच्या खंडानंतर देशातील १२ हून जास्त राज्यांत एकाच वेळी जोरदार पाऊस झाला. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, बिहार, छत्तीसगड, आसाम, पश्चिम बंगाल, हिमाचल, उत्तराखंड, जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या हानीचे वृत्त आहे. अनेक राज्यांत पूरस्थिती आहे. मुंबईची तुंबई करणाऱ्या पावसाने शनिवारी राजस्थानच्या जयपूरमध्ये पाणीच पाणी झाले होेते. तेथे ८.४ सेंमी पावसाची नोंद झाली. राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. सिकर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांच्या मते, जिल्ह्यात ५ जणांचा पावसामुळे घडलेल्या घटनांत मृत्यू झाला. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ८४ मिमी पावसाची नोंद झाली. अजमेर-६४ मिमी, भिलवाडा- कोटामध्ये ६३ मिमी पाऊस झाला. चुरूमध्ये घरे-दुकानांत पाणी घुसले आहे.

 

चंदिगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद.

हिमाचलच्या मंडीबरोबरच चंदिगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी भूस्खलन झाले. त्यामुळे महामार्ग बंद झाला. महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यात पर्यटक मोठ्या संख्येने अडकून पडले आहेत. राज्यात भूस्खलनामुळे ५३ मार्गावरील वाहतूक बंद पडली आहे. त्यापैकी ३६ मार्ग मंडी व १७ मार्ग सिमला भागातील आहेत. तेथे काही पर्यटक अडकले आहेत. उत्तर प्रदेेशातील मुजफ्फरनगरमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने २ घरांचे छत कोसळल्याची घटना घडली. त्यात चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. राज्यात झेलम व चिनाब नद्यांनी धोक्याची पातळी आेलांडली आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये भूस्खलनात एका महिलेचा मृत्यू झाला. 
 

दिल्लीत आतापर्यंत पावसाची ३८ % घट
मान्सूनचे आगमन होऊन ५७ दिवस लाेटले, परंतु देशात अजूनही पाऊस १६ टक्के कमी पडला आहे. १ जून ते २६ जुलैपर्यंत देशभरात सरासरी ३३९.७ मिमी पाऊस झाला. दिल्लीत आतापर्यंत ३८ टक्के कमी पाऊस झाला. यूपी-१ टक्के, राजस्थान-१३ टक्के, हरियाणा-२७ टक्के, मध्य प्रदेश-१३ टक्के, झारखंड-४० टक्के कमी पाऊस झाला. 
 

पुढचे २४ तास : महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात  तसेच १२ राज्यांत अलर्ट 

> हवामान विभागाने चोवीस तासांत गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, पूर्व राजस्थानात अतिवृष्टीचाही इशारा दिला आहे.
> अरबी व बंगालच्या खाडीत रविवारी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज. गुजरात व महाराष्ट्र किनारी सतर्कतेचा इशारा .

 

आसाममध्ये  ३१ जिल्ह्यांना फटका 

> आसाममध्ये ३३ पैकी ३१ जिल्ह्यांत पुराचा सुमारे ५७ लाख लोकांना फटका . ८० जणांचा मृत्यू झाला.
> काश्मीरच्या कठुआ, डोडामध्ये पावसाचे पाणीच पाणी झाले. जम्मू विमानतळावरही तळे साचले. 

> राजस्थानमध्ये सिकरसह काही ठिकाणी झालेल्या पावसाच्या दुर्घटनांत आतापर्यंत ५ जण ठार. 

 

देशाची मान्सून डायरी 

> आतापर्यंत देशात १६ % पेक्षा कमी पाऊस 
> आकडे- १ जून ते २६ जुलैपर्यंतचे.  स्रोत-आयएमडी

> 17 राज्यांत सरासरी, चार राज्यांत सरासरीपेक्षा जास्त
> 14 राज्यांत सरासरीहून घट झाली. एका राज्यात खूप कमी पावसाची नोंद. 

बातम्या आणखी आहेत...