आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 48 तासांत केरळात दाखल होऊ शकतो पाऊस, यंदा पावासाचा जोर कमी राहणार असल्याचा स्कायमेटचा अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या 48 तासांत पाऊस केरळमध्ये दाखल होणार अशी शक्यता हवामान संस्था स्कायमेटने बुधवारी वर्तवली आहे. दिल्ली एनसीआरपर्यंत पावसाळा पोहोचण्यासाठी आणखी 10 ते 15 दिवस लागतील. दिल्ली आणि जवळपासच्या राज्यांमध्ये मॉनसून जूनपर्यंत पोहोचतो. स्कायमेटने सांगितल्याप्रमाणे, यावर्षी होणाऱ्या पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, हवामान विभागाने सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या पावसाळ्यात 96% पावसाची शक्यता वर्तवली आहे.


ग्लोबल वॉर्मिंगचा वाइट परिणाम
स्कायमेटचे तज्ज्ञ समर चौधरी यांनी सांगितल्याप्रमाणे, अल नीनो आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे या वर्षी पावसाचा जोर कमीच राहण्याची शक्यता आहे. तरीही देशभर सरासरी 93 टक्के पाऊस पडू शकतो. ही टक्केवारी दरवर्षी होणाऱ्या सरासरी पावसापेक्षा कमीच आहे. 65 वर्षांमध्ये ही दुसरी वेळ आहे, जेव्हा प्री-मानसूनमध्ये पाऊस पडला नाही. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सरासरी 131.5 मिलीमिटर पावसाची नोंद केली जाते. यावेळी ती फक्त 99 मिमी इतकी झाली आहे. चौधरी म्हणाले, की "पूर्वेकडे जाणाऱ्या वाऱ्यांमध्ये आर्द्रता दिसून आली आहे. तरीही दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतानाच दिसून आला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, 2014 मध्ये 5 जून, 2015 मध्ये 6 जून आणि 2016 मध्ये 8 जूनला पावसाळ्यास सुरुवात झाली होती. तर 2018 मध्ये 29 मे रोजीच पाऊस भारतात धडकला होता. गेल्यावर्षी सरासरी सामान्य पावसाची नोंद झाली होती.

बातम्या आणखी आहेत...