Home | National | Delhi | Monsoon to make onset over Kerala on June 4 Skymet Weather

मान्सूनचे आगमन लांबणार, देशासह राज्यात यंदा कमी पावसाची शक्यता, स्कायमेटचा अंदाज 

वृत्तसंस्था | Update - May 15, 2019, 08:46 AM IST

केरळच्या किनाऱ्यावर ४ जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यात दोन दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे

 • Monsoon to make onset over Kerala on June 4 Skymet Weather

  नवी दिल्ली - केरळातील मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवस उशिराने म्हणजे ४ जून रोजी होण्याची शक्यता स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवली आहे. साधारणपणे एक जून रोजी केरळात मान्सून दाखल होतो. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतीन सिंह यांनी मंगळवारी मान्सूनचा ताजा अंदाज जाहीर केला. त्यांनी सांगितले, केरळच्या किनाऱ्यावर ४ जूनला मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. यात दोन दिवस मागे-पुढे होण्याची शक्यता आहे. सिंह म्हणाले, यंदा मान्सून फारसा चांगला राहणार नाही व पाऊस कमी होण्याची शक्यता आहे.


  स्कायमेटच्या हवामान अंदाज आणि हवामान बदल विभागाचे प्रमुख निवृत्त एअर व्हाइस मार्शल जी.पी. शर्मा यांनी सांगितले, या वेळी मान्सूनचे केंद्र अरबी समुद्रात राहील, हे चांगले चिन्ह नाही. यामुळे मोसमी वारे वायव्य दिशेला जास्त प्रमाणात सरकून, ते देशाच्या पठारी भागापासून दूर जातील. स्कायमेट आपल्या पहिल्या अंदाजावरच ठाम असून यंदा देशात सरासरीच्या ९३ टक्के पाऊस होईल. म्हणजेच, देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल.


  गतवर्षी कमी पाऊस, यंदा मांजरा नदीचे पात्र कोरडे
  उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब शहराजवळून वाहणारी मांजरा नदी सध्या कोरडी पडली आहे. गतवर्षी नदीत २२०० घनमीटर पाणी होते. मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा नदीपात्र कोरडे पडले आहे.


  अल निनोमुळे : मध्य भारतासह मराठवाडा, विदर्भात कमी पाऊस
  - स्कायमेटच्या अंदाजानुसार, मध्य भारतात सर्वात कमी ९१ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पूर्व व ईशान्य भारतात ९२ टक्के, दक्षिण भारतात ९५ टक्के आणि वायव्य भारतात ९६ टक्के पावसाचा अंदाज आहे.
  - देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ९६ ते १०४ टक्के पाऊस झाल्यास तो साधारण किंवा सरासरीइतका मानतात.
  - पाऊस ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास तो सरासरीपेक्षा कमी झाला असे मानले जाते.
  - यंदा मध्य भारतातील मराठवाडा, विदर्भ, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात पाऊस कमी होण्याची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे.
  अल निनोचा परिणाम : मोसमी वाऱ्यांची दिशा बदलते. हमखास पावसाच्या भागात पाऊस पडत नाही, तर पाऊस न पडणाऱ्या भागात मुसळधार पाऊस पडतो.

 • Monsoon to make onset over Kerala on June 4 Skymet Weather

Trending