आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांत पहिल्यांदाच पंधरा दिवसांच्या विलंबाने माघारी, 20 राज्यांत जोर कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली / लखनऊ - परतीचा मान्सून अनेक राज्यांत लोकांसाठी जीवघेणा बनला आहे. देशातील २० पेक्षा जास्त राज्यांत २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे आतापर्यंत ५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले आहेत. पूर्व उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत पावसामुळे घडलेल्या विविध घटनांत ४० जणांचा मृत्यू झाला. लखनऊ, वाराणसी, गोरखपूर, फैजाबादसह अनेक जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांत पाऊस सुरू आहे. येथील शाळांत सुटी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणात जोरदार पावसामुळे राजधानी हैदराबाद व परिसरात पूरस्थिती आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यापासून मान्सून शेवटच्या टप्प्यात आहे. परंतु प्रचंड पावसामुळे ही मान्सूनची सुरुवात असल्यासारखे वाटू लागले आहे. ६० वर्षांत पहिल्यांदाच यंदा मान्सून १५ दिवस उशिराने माघारी जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी १९६० मध्ये मान्सून एवढा दीर्घकाळ सक्रिय राहिला होता. 

  • का पडतोय पाऊस

कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्याने पडतो पाऊस 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्ट्याचे क्षेत्र निर्माण झाल्याने तेलंगण, दक्षिण भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच महाराष्ट्रातील किनाऱ्याजवळील गोवा-कर्नाटक आणि गुजरातच्या पूर्व आणि मध्य अरबी समुद्राजवळील क्षेत्रामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. यासोबतच उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्चिमच्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.

  • पुढे काय : १८ राज्यांत दोन दिवस पाऊस शक्य

हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, कर्नाटक, गोवा, केरळ, गुजरात, हिमाचल, उत्तराखंड, प. बंगाल, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये येत्या दोन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

  • मान्सून : देशभरात सरासरीहून ७ टक्के जास्त

देशभरात आतापर्यंत ९३१.६ मिमी पाऊस झाला. सरासरी पावसाचा कोटा ८६९.४ मिमी अाहे. अर्थात ७ टक्क्यांहून जास्त पाऊस झाला. देशातील ११ राज्यांत सरासरीहून जास्त पावसाची नोंद आहे. १६ राज्यांत सरासरी व ८ राज्यांत पावसाची तुटीची नोंद. 

  • आधी : १ सप्टेंबरपासून माघारी

देशात मान्सून पश्चिम राजस्थानमधून १ सप्टेंबरपासून माघारी जाण्यास सुरुवात होते. परंतु यंदा पश्चिम राजस्थानमध्ये सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यातही पाऊस सुरू आहे.