आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या १३% भागात ३ दिवसांमध्येच मान्सूनचा १९% पाऊस, २७ जण ठार; ५ राज्यांमध्ये हाय अलर्ट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- उत्तर भारतात शनिवारपासून अतिवृष्टी होत आहे. पंजाब, हिमाचल, उत्तराखंड व काश्मिरात संपूर्ण मान्सूनचा १९% पाऊस ३ दिवसांतच झाला. पंजाबमध्ये ३ दिवसांत ११२ मिमी (मान्सूनचा २२%) पाऊस झाला. सर्वाधिक नुकसान हिमाचल व उत्तराखंडात झाले. हिमाचलात नद्यांच्या पाणी पातळीत वाढ व दरडी कोसळल्याने कुल्लू-मनालीकडील हायवेसह ३७८ रस्ते वाहून गेले. उत्तराखंडात चारधाम यात्रा थांबवली. तेथे ४८ मार्ग बंद आहेत. ५ राज्यांत २७ जणांचा मृत्यू झाला. हिमाचलमध्ये ५, हरियाणात ७, पंजाबमध्ये, १, उत्तराखंडात ६ व जम्मू काश्मिरात ८ जणांचा बळी गेला. 


हरियाणात ३० लाख एकर पिके उद्ध्वस्त

राज्यात ३० लाख एकरवरील धानाचे पीक उद्ध्वस्त झाले. पंजाबमध्ये कापूस-धानाचे पीक नष्ट झाले. हिमाचलात ४७० कोटींचे नुकसान झाले.


पंजाबमध्ये पिकांचे मोठे नुकसान  
गेल्या ६० तासांतील सलग पावसामुळे पंजाबमधील धान, ऊस, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रविवारच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील धान शेतीचे नुकसान झाले. पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये जगराओ, मलेरकोटला, संगरूर, मोगा, फतेहगड, पतियाळा आणि जालंधरचा समावेश आहे. धानाचे लवकर उत्पन्न येणारे वाण व व ऊस लोळला आहे. जालंधरमध्ये १ लाख ७० हजार हेक्टरमध्ये धान व १० हजार हेक्टरमध्ये ऊस आहे. पाणी एक-दोन दिवस शेतात राहिल्यास पीक हातचे जाईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


मनालीचा संपर्क तुटला  
मनालीचा जिल्हा मुख्यालय कुलूशी संपर्क तुटला आहे. गेल्या २४ तासांतील पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत.  मनाली-चंदिगड महामार्गावर रविवारी एक ट्रक व बस वाहून गेली. बियास नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  हवामान केंद्रातील सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार, गेल्या २४ तासांत चंबा जिल्ह्यातील डलहौसीमध्ये १७० मिमी, मनाली १२१ मिमी, चंबा ११७ मिमी, कांग्रा १२०.८ मिमी, पालमपूर १०८ मिमी, धर्मशाला ६२.६ आणि उनामध्ये ६२ मिमी पाऊस झाला. राजधानी सिमलामध्ये २३.१ मिमी पाऊस पडला.  

 

मुसळधारची ३ कारणे 
पहिले
: हरियाणा राज्यावर हवेचा कमी दबाव तयार झाला. 
दुसरे : अपर एअर सायक्लोनिक सर्क्युलेशन प्रचंड वाढले. 
तिसरे : पश्चिम विक्षोभही सक्रिय झाल्याने तीव्रतेत झाली वाढ.

बातम्या आणखी आहेत...