आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका महिन्याच्या मुलाने 29 वर्षांनंतर घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, धारदार शस्त्राने केले असंख्य वार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या राजधानीतील एका गावात 68 वर्षीय व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. पीडित वृद्धावर इतके वार करण्यात आले होते की मृतदेह सुद्धा विक्षिप्त झाला होता. पोलिसांनी रविवारी झालेल्या या घटनेचा मंगळवारी छळा लावला. पीडित वृद्धाच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपी हा 29 वर्षांचा युवक निघाला. या युवकासोबत पीडितांचे इतके चांगले संबंध होते, की तो असे काही करेल याचा विचारही आला नव्हता. परंतु, आरोपीला अटक केल्यानंतर बदल्याची खरी कहाणी समोर आली.


एका महिन्याचा असताना झाला होता वडिलांचा खून
पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव कल्याण सिंह रावत असून तो 29 वर्षांचा आहे. त्याने अटकेनंतर पोलिसांना या खुनाचे खरे कारण सांगितले. गोसाइगंज येथे 1990 मध्ये राम स्वरुप नावाच्या एका व्यक्तीचा खून झाला होता. या हत्येचा मुख्य आरोपी गावातच राहणारा सुंदरलाल रावत होता. राम स्वरुपची हत्या झाली तेव्हा त्याला एका महिन्याचा मुलगा होता. त्याच मुलाचे नाव कल्याण सिंह होते. कल्याणने आपल्या वडिलांना कधीच पाहिले नव्हते. मोठा झाला तेव्हा मनात प्रश्न येत गेली. आईला अनेकदा वडिलांच्या मृत्यूबद्दल विचारणा केली. परंतु, अपेक्षित उत्तर मिळाले. त्यातच बाहेरूनच आपल्या वडिलांचा खून झाला होता अशी माहिती कल्याणला मिळाली. आईला पुन्हा विचारले तेव्हा तिने आरोपी सुंदरलाल रावतचे नाव घेतले. तेव्हापासूनच कल्याणने बदला घेण्याचा संकल्प घेतला.


सुंदरलाल रावतपर्यंत पोहोचण्यासाठी अगदी फिल्मी स्टाईलने कल्याणने सुंदरचा मुलगा आशारामशी मैत्री केली. याच मैत्रीतून कल्याण सुंदरच्या घरी पोहोचला आणि त्या कुटुंबाशी जवळिक साधली. 30 जून रोजी कल्याणने घरात आपण आणि सुंदरशिवाय दुसरे कुणीच नसल्याचा गैरफायदा घेतला. तसेच धारदार शस्त्राने असंख्य वार करून सुंदरचा खून केला. कल्याणने बदला घेण्याची कहाणी अतिशय फिल्मी होती. परंतु, प्रत्येक चित्रपटात बदला घेणारा असो की खलनायक तो पोलिसांच्या तावडीत सापडतोच या गोष्टीचे कदाचित त्याला भान नव्हते. दोन दिवस फरार राहिल्यानंतर पोलिसांनी त्याला जवळच्याच एका गावातून अटक केली.