Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | masik rashifal december 2018 in marathi

राशिफळ : 2018 मधील शेवटच्या महिन्यात कोणत्या लोकांना मिळणार नशिबाची साथ

रिलिजन डेस्क | Update - Dec 03, 2018, 12:01 AM IST

नवीन महिना डिसेंबर झाला आहे सुरु, या महिन्यात 16ला सूर्य आणि 23ला मंगळ करणार राशी परिवर्तन, सर्व 12 राशींवर पडेल शुभ-अशु

 • masik rashifal december 2018 in marathi

  वर्ष 2018 मधील शेवटचा महिना डिसेंबर सुरु झाला आहे. या महिन्यात चंद्र, सूर्य आणि मंगळ फक्त हे 3 ग्रह राशी परिवर्तन करतील. इतर ग्रहांच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होणार नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 16 डिसेंबरला सूर्य वृश्चिक राशीतून धनु राशीमध्ये प्रवेश करेल. मंगळ 23 डिसेंबरला कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करेल. बुद्ध आणि गुरु ग्रह वृश्चिक राशीमध्ये, शुक्र तूळमध्ये, शनी धनुमध्ये, राहू कर्कमध्ये आणि केतू मकर राशीमध्ये राहील. या ग्रहांच्या स्थितीनुसार जाणून घ्या, हा महिना तुमच्या राशीसाठी कसा राहील...


  मेष
  या महिन्यात आर्थिक गुंतवणूक करण्याविषयी विचार करत असाल तर काही काळासाठी योजना पुढे ढकला. अन्यथा नुकसानाच्या शक्यता आहेत. प्रसंगावधान पाळून कपटी आणि धूर्त लोकांपासून स्वत:चा बचाव करावा, अन्यथा येणारा काळ समस्या व अडचणींचा असू शकतो. तुम्ही विवाहयोग्य असाल किंवा घरातील अपत्ये, भावंडे विवाहयोग्य असतील तर विवाहाचे योग निश्चित आहेत.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा महिना...

 • masik rashifal december 2018 in marathi

  वृषभ
  या महिन्यात शेअर बाजाराकडून लाभाचे योग आहेत. कायदेशीर बाबीत दीर्घकाळापासून अडकला असाल तर निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. शुभवार्ता कानी पडू शकते. तुमच्या बाबी गुप्त ठेवा. प्रतिस्पर्ध्यांपासून शक्य तितके सजग राहा. कामाविषयी काही आव्हाने निर्माण होण्याची शक्यता आहे.  

 • masik rashifal december 2018 in marathi

  मिथुन
  या काळात धनलाभाचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी सरस ठरणार आहे. तुमच्या कल्पनांची प्रशंसा होईल. प्रवास करणार असाल तर साहसी प्रवासाचा योग आहे. तुमचा आशावाद इतरांनादेखील प्रभावित करणारा ठरेल. तुमच्या आसपासचे लोक अत्यंत प्रसन्नचित्त असतील.  

 • masik rashifal december 2018 in marathi

  कर्क
  तुमच्यासाठी व्यक्तिगत संवाद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यावर  लक्ष केंद्रित करण्यासाठी तुमचा बराच वेळ खर्ची पडेल. घरगुती आणि नातलगांच्या कामांसाठी व्यग्र राहावे लागेल. जोडीदाराला विशिष्ट कामासाठी मदतीची गरज पडणार आहे. तुमच्या रचनात्मक सामर्थ्याचा कस पाहणारा हा काळ आहे. 

 • masik rashifal december 2018 in marathi

  सिंह 
  तुमची योग्यता आणि प्रतिभा लोकांना माहीत आहे, पण त्याचा काही काळापासून फायदा मिळत नव्हता. ज्या योजना थोड्या धूळ खात पडल्या होत्या, त्यात तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून त्या अमलात आणू शकता. व्यावसायिक आणि व्यक्तिगत स्तरावर तुम्ही आनंदी असाल. 

 • masik rashifal december 2018 in marathi

  कन्या
  तुमच्यासमाेर काही अशी अाव्हाने उभी राहतील, ज्यांचा सामना तुम्हास हिमतीसाेबत विचारपूर्वक करावा लागेल. तुमच्यात ऊर्जा व अात्मविश्वासाचा संगम राहील. त्यांच्या मदतीने तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात संतुलन निर्माण करण्याची अावश्यकता अाहे.

 • masik rashifal december 2018 in marathi

  तूळ 
  या वेळी तुम्ही अशा गाेष्टीत गुंतवणूक करू शकता, जेथून कदाचित अपेक्षित लाभ हाेणार नाही. विराेधकांपासून थाेडे सांभाळून रहा. नाही तर काम तुम्ही कराल व श्रेय त्यांना मिळेल. त्यामुळे थोडी दक्षता घ्यावी लागेल. तसेच सध्या काेणतेही नवीन काम सुरू करू नका. प्रेमसंबंध मजबूत हाेतील.

 • masik rashifal december 2018 in marathi

  वृश्चिक
  या महिन्यात गुंतवणुकीशी संबंधित प्रकरणांत घाईने घेतलेले निर्णय आत्मघातकी ठरू शकतात ही गोष्टही लक्षात ठेवा. जवळचे लोक किंवा नातेवाईक यांच्याबाबत अशी भावनात्मक स्थिती निर्माण होऊ शकते, जी तुमच्यासाठी हितकर नसेल. अशा कुठल्याही अवस्था वेळेआधी रोखण्याचा प्रयत्न करा.

 • masik rashifal december 2018 in marathi

  धनु
  सध्या अनेक प्रकारच्या अडचणी किंवा आव्हानांचा सामना करावा लागेल. तुमचे विचार आणि योजनांचा एक प्रभाव राहील, पण त्याच्याशी इतर लोकांनी सहमत असावे अशी अपेक्षा केली तर निश्चितच निराशा हाती लागेल. चर्चेतून काही प्रकरणे सुटूही शकतात ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. 

 • masik rashifal december 2018 in marathi

  मकर
  अकारण खर्च वाढू शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीवर तुमचा खर्च होऊ शकतो. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती डळमळू शकते. कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते. त्यामुळे तुमच्या सहकाऱ्यांचा जळफळाट होऊ शकतो. ते तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्नही करू शकतात. 

 • masik rashifal december 2018 in marathi

  कुंभ
  जर नोकरीच्या शोधात असाल किंवा एखादा नवा व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला यश मिळेल. जर कोणी तुमच्याविरुद्ध कट रचण्याचा विचार करत असेल तर त्याला अपयशच मिळेल. पराक्रम आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आळस तुम्हाला शिवणारही नाही.

 • masik rashifal december 2018 in marathi

  मीन
  थकवा आणि आळस यांचा त्याग करून तुम्ही पुढे जाऊ शकाल. नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल. त्यामुळे बिघडलेली कामे आपोआप पूर्ण होतील. आर्थिक बाजू मजबूत राहील. कारकीर्दीत पुढे जाण्यासाठी तुम्हाला साम, दाम, दंड, भेद सर्व काही अवलंबावे लागेल. अर्थात ते एवढे सोपेही नसेल.

Trending