• Home
  • Business
  • Monthly extension to Synergy Group for Jet Airways' resolution plan

मुंबई / जेट एअरवेजच्या रिझोल्युशन प्लॅनसाठी सिनर्जी ग्रुपला महिन्याची मुदतवाढ

एनसीएलटीच्या सहमतीसाठी प्लॅन २८ ऑक्टोबरला सादर करायचा होता, ग्रुपजवळ रिझोल्युशन प्लॅन देण्यासाठी आता १५ नोव्हेंबरचा अवधी

Oct 16,2019 10:08:00 AM IST

मुंबई : जेट एअरवेजला कर्ज देणाऱ्या समितीने सिनर्जी ग्रुपला फेरउभारणी नियोजना(रिझोल्युशन प्लॅन)साठी बनवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला खरेदी करण्यासाठी सिनर्जी ग्रुपने एकट्याने इच्छा व्यक्त केली होती. ग्रुपजवळ आतापर्यंत १५ नोव्हेंबरपर्यंतचा अवधी आहे. सूत्रांनुसार, जेट एअरवेजमध्ये गुंतवणुकीसाठी सिनर्जी ग्रुपने बर्ड ग्रुपशी चर्चा केली आहे. बर्ड भारतसह अनेक देशांत हवाई वाहतूक व्यवस्थापन आणि अन्य सेवा देते. प्रकरणाची माहिती देणाऱ्या सूत्रांनुसार, अतिरिक्त अवधी मिळाल्याने फेररचनेचे नियोजन डिसेंबरपर्यंत जाऊ शकते. कॉफी चेन बरिस्ताचे पहिले सीईओ रवी दयोल यांनीही सिनर्जी ग्रुपच्या मालकांसोबत बैठक केली. आधीच्या अवधीनुसार १४ ऑक्टोबरपर्यंत रिझोल्युशन प्लॅन देण्याचा अवधी दिला होता आणि एनसीएलटीच्या सहमतीसाठी तो २८ ऑक्टोबरला समोर सादर करावयाचा होता. सिनर्जी ग्रुप सध्या योग्य ती काळजी घेत आहे. एअरलाइन्सच्या उभारणीनंतर किती दिवसांनंतर सर्व उड्डाणे सुरू करू शकते यासंदर्भात व्यवस्थापनाशी चर्चा केली आहे. डीजीसीएने जेट एअरवेजला जानेवारीच्या मध्यापर्यंत अवधी दिला असून उन्हाळ्यातील स्लॉटसाठी प्लॅन देण्यास सांगितले आहे.


रिझोल्युशन प्रक्रियेअंतर्गत १६ डिसेंबरला अवधी समाप्त...
जेट एअरवेज ६ महिन्यांपासून कार्यरत नाही. कंपनीला दिलेले मार्ग अन्य एअरलाइन्सला दिले आहेत. जेट एअरवेजने २० जूनला दिवाळखोरीसाठी अर्ज दिला होता. कॉर्पाेरेट इन्सॉल्व्हन्सी रिझोल्युशन प्रोसेस(सीआयआरपी) अंतर्गत १८० दिवसांचा अवधी १६ डिसेंबरला समाप्त होत आहे. जेटच्या दिवाळखोरीच्या ऑर्डरमध्ये म्हटले होते की, एअरलाइन्सला वाचवण्याचा विषय राष्ट्रीय महत्त्वाशी जोडला आहे. कंपनीत २०,००० पेक्षा जास्त लाेक काम करतात. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीननुसार, धनकाेंनी ३०,९०७ कोटींचे दावे केले आहेत. रिझोल्युशन प्लॅनमध्ये १४,००० कोटीचे दावे सादर केले आहेत.


जेट एअरवेजने अवैध कराराद्वारे केली पैशाची अफरातफर...
जेटर एअरवेजचे संस्थापक नरेश गाेयल यांच्याविरुद्ध सुरू चौकशीत विमान कंपनीने टॅक्स हेवन्समध्ये रिलेटेड ऑफशोर पार्टीज म्हणजे आपल्याशी संबंधित विदेशी शाखांच्या बाजारभावापेक्षा जास्त दराने अवैध करार केले होते. प्रकरणाशी संबंधित लोकांना सांगितले की, यामुळे एअरलाइन्सशिवाय सरकारी खजिन्याला फटका बसला. सूत्रांनुसार, जेट एअरवेज व त्यांच्या ग्रुप कंपन्यांनी भाडेतत्त्व व मेंटेनन्सच्या कराराशिवाय जनरल सेल्स एजंट अॅग्रीमेंट केले होते अशा विदेशी शाखांची माहिती ईडीने जमा केली आहे. ईडीने ही माहिती टोरंटोच्या एगमाँट ग्रुपकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जमा केली.


माजी चेअरमन नरेश गोयल यांची ईडीकडून चौथ्यांदा चौकशी...
जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांची मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) चौकशी केली. नरेश गोयल यांच्यावर बनावट कंपन्यांद्वारे पैशाची अफरातफर केल्याचा आरोप आहे. याआधी नरेश गोयल यांची अनेकदा चौकशी झाली आहे. नरेश गोयल यांची या प्रकरणात ईडीने आतापर्यंत चार वेळा चौकशी केली आहे. गेल्या आठवड्यात ईडीने नरेश गोयलच्या पत्नीचीही चौकशी झाली आहे. त्याआधी जेट एअरवेजचे माजी चेअरमन नरेश गोयल यांची विदेशी विनिमय व्यवस्थापन अधिनियमाच्या उल्लंघन प्रकरणात दीर्घ चौकशी झाली आहे.

X