आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना गुंतवणुकीवर मिळणार मासिक उत्पन्न; मासिक वेतनासारखा पत्नीच्या नावे मिळणार लाभ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मनीबॅक पॉलिसीमध्ये ज्याप्रमाणे आपण पैसे भरल्यानंतर ठराविक काळाने पैसे मिळतात अगदी तशीच परंतु पगारासारखी योजना राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांना काही अटींसह मासिक वेतन देणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकारही तशाच पद्धतीची योजना आणेल. राज्याचे महसूल आणि कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा योजनेची घोषणा सांगली जिल्ह्यात येथे एका कार्यक्रमात शनिवारी केली. 

 

केंद्र सरकार प्रत्येक मोसमात प्रती एकर प्रति महिना ४ हजार रुपये देणार आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे टाकली जाईल. त्याच धर्तीवर राज्य सरकारही अशी योजना आणणार आहे. पाटील यांनी म्हटले आहे, की सरकारी आणि खासगी नोकरदारांना जसा दरमहा निश्चित पगार मिळतो, त्याच धर्तीवर राज्य सरकार इथून पुढे शेतकऱ्यांना मासिक पगार देण्याची योजना आणणार आहे. या योजनेत चार महिने संबंधित शेतकऱ्याने सरकारकडे हप्ते भरावयाचे असून उर्वरित हप्ते सरकार भरणार आहे. त्यानंतर दरमहा शेतकऱ्याच्या पत्नीच्या नावावर तिच्या खात्यावर थेट पैसे जमा होतील अशी व्यवस्था केली जाणार आहे. 

 

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये शेतकरी त्याचा माल विकतो. या काळात शेतकऱ्याकडे पैसा असतो. त्याने चार हप्त्यात ३० हजार रुपये भरल्यानंतर त्याच्या पत्नीच्या नावावर दर महिन्याला तीन हजार रुपये दिले जाणार असून त्याला ३० हजार रुपये गुंतवणूक करून ३६ हजार रुपये मिळणार आहेत. त्याच्या गुंतवणुकीवर सरकार १९ टक्के व्याज देणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.