Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | moral story about woman and lion

कधीही अधर्मी व्यक्तीसोबत राहू नये अन्यथा आयुष्य होऊ शकते उद्धवस्त

रिलिजन डेस्क | Update - Feb 07, 2019, 12:06 AM IST

जंगलात एका साधूने महिलेच्या रडण्याचा आवाज ऐकला, साधूने महिलेला विचारले तू एकटी या जंगलात बसून का रडत आहेस? महिला म्हणाली

 • moral story about woman and lion

  चीनचे प्रसिद्ध संत कन्फ्यूशियस आपल्या शिष्यांसोबत जंगलातून एका ठिकाणी चालले होते. रस्त्यामध्ये त्यांना एका महिलेच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. संत सर्व शिष्यांना म्हणाले काहीही न बोलता हळू-हळू चालत राहा म्हणजे आपण त्या महिलेला शोधण्यात यशस्वी होऊ. सर्वजण महिलेचा आवाज येत असलेल्या दिशेने पुढे चालू लागले. थोड्या वेळातच संत आणि शिष्य त्या महिलेजवळ पोहोचले.


  > संतने महिलेला विचारले, तुम्ही एकट्या या जंगलात बसून का रडत आहात?


  > महिला म्हणाली- काही दिवसांपूर्वी वाघाने माझ्या पतीला येथे मारून टाकले होते. तेव्हापासून मी माझ्या मुलासोबत येते जंगलात राहत होते. आज वाघाने माझ्या मुलालाही मारून टाकले.


  > हे ऐकून संत म्हणाले, येथे वाघाचा वावर असताना तुम्ही गावामध्ये राहायला का जात नाही?


  > महिला म्हणाली- या राज्याचा राजा अधर्मी, अत्याचारी आहे. त्याच्या राज्यामध्ये राहण्यापेक्षा आम्ही या जंगलात राहिलेले कधीही चांगले. वाघ कधी न कधी तर मरेल. त्या राजाच्या राज्यामध्ये कोणीही सुरक्षित नाही. यामुळे आम्ही येथे राहण्यासाठी आलो होतो.


  कथेची शिकवण
  > संताने आपल्या शिष्यांना सांगितले की या घटनेत खूप मोठी शिकवण दडलेली आहे. आपण कधीही अधर्मी, अत्याचारी व्यक्तीसोबत राहू नये. आपण सत्ताधारी लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करावा. हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे अन्यथा संपूर्ण प्रजा यामुळे उद्धवस्त होऊ शकते.

Trending