आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रत्येक परिस्थिचा परिणाम एकसारखाच असेल असे नाही, परिणाम बदलूही शकतात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याच्याकडे तीन उंट होते आणि तो वेगवेगळ्या शहरात जाऊन व्यवसाय करायचा. एकदा दुसऱ्या शहरात जात असताना प्रवासात रात्र झाली. शेठने रात्री येथेच थांबून सकाळी पुढे निघू असा विचार केला.


असा विचार करून शेठजीने उंट तंबूच्या बाहेर बांधू लागला. दोन उंट बांधल्यानंतर त्याची दोरी संपली. तिसरा उंट बांधला नाही तर तो पळून जाईल असा विचार शेठजीच्या मनात आला. तेवढ्यात तेथून एक साधू जात होता. व्यापाऱ्याला वैतागलेले पाहून त्यांनी कारण विचारले. शेठजीने संपूर्ण प्रकार सांगितला.


साधू म्हणाले- दोन उंट ज्याप्रकारे बांधले तसेच तिसराही बांधून टाक. शेठजीने विचारले- कसे? साधू म्हणाले तू फक्त दोरी बांधल्याचे नाटक कर. शेठजीने तसेच केले. अशाप्रकारे तिन्ही उंट एका ठिकाणी बसले. शेठजीसुद्धा जाऊन झोपले. रात्रभर शेठजी तिसऱ्या उंटाचा विचार करत बसले.


सकाळी झोपेतून उठल्यानंतर शेठजीने सर्वात पहिले उंट जागेवर आहेत का नाही ते पाहिले. तिन्ही उंट जागेवरच होते. प्रवासाला निघाल्यानंतर जे उंट दोरीने बांधलेले होते ते चालू लागले परंतु तिसरा उंट तेथेच बसून होता. क्रोधात येऊन शेठजी त्या उंटाला मारू लागले.


तेवढ्यात तेथून रात्रीचे साधू चालले होते. त्यांनी पुन्हा शेठजीला क्रोधाचे कारण विचारले. शेठजीने पूर्ण प्रकार सांगितला. साधू म्हणाले - काल ज्याप्रमाणे तू दोरी बांधण्याचे नाटक केले होते त्याचप्रमाणे आज दोरी सोडण्याचे नाटक कर. शेठजीने तसेच केले आणि उंट उठून उभा राहिला.


लाइफ मॅनेजमेंट
आपण अनेकवेळा काही गोष्टी मानून चालतो की, याचा परिणाम असाच होणार. प्रत्येक वेळी परिस्थितीचा परिणाम एकसारखाच होईल असे घडत नाही. परिणाम बदलू शकतात परंतु त्यासाठी त्या परिस्थितीनुसार विचार करण्याची आवश्यकता आहे. 1-2 वेळेस घडलेल्या घटना लक्षात ठेवून आपण कोणतेही परसेप्शन बनवू नये.