Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | moral story, motivational story of king and life management, inspirational story, story for success

एक संत आणि त्यांच्या पत्नीला अनेकवेळा रात्री उपाशी झापावे लागायचे, जेव्हा ही गोष्ट राजाला कळाली तेव्हा राजाने त्यांच्यासाठी धान्य आणि पैसे पाठपले, पण संतांनी ते सर्व घेण्यास नकार दिला...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 23, 2019, 02:38 PM IST

संत खूप स्वाभिमानी होते ते कोणाकडूनच धनाची अपेक्षा करत नव्हते

 • moral story, motivational story of king and life management, inspirational story, story for success

  रिलीजन डेस्क- एका गावात खूप गरीब संत राहात होते, त्यांची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. कधी कधी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला उपाशी राहून दिवस काढावे लागत असे. गावातील सर्व लोक संतांचा सन्मान करत होते, पण संत खूप स्वाभिमानी होते ते कोणाकडूनच धनाची अपेक्षा करत नसत.


  एक दिवस राज्याच्या राजाला ही गोष्ट कळली तेव्हा त्याला वाटले की आपण संताची मदत करायला हवी. राजा आपल्या मंत्र्याला आदेश दिला की संताच्या घरी थोडेसे धन आणि धान्य लगेच पाठवा. राजाची आज्ञा ऐकून मंत्र्यानी संतांच्या घरी धन आणि धान्य पाठवले. एवढे धान्य आणि पैसे पाहून संताच्या पत्नीला वाटले की आता आपला वाईट काळ दूर होईल, सर्व काही चांगले होईल. काही वेळाने संत घरी आले तेव्हा त्यांना कळले की राजाला आपल्याला हे दान दिले आहे.


  संत राजाने दिलेले सर्व दान घेऊन राजदरबारात पोहचले. संत दरबारातील मंत्र्याना म्हणाले मी राजाला ओळखत नाही आणि राजाही मला वैयक्तिकरित्या ओळखत नाही. राजाने फक्त लोकांचे ऐकून मझ्यावर ही कृपा केली आहे. मी हे दान स्विकारू शकत नाही. जो आनंद स्वतः कमावलेल्या कमाईचा मिळतो, तो दान दिलेल्या पैशात मिळत नसतो. म्हणून राजाला हे धन परत करा.

  कथेची शिकवन
  व्यक्ती हा स्वाभिमानी असला पाहीजे. दूसऱ्याने दिलेले दानाने आपण कधीही आनंदी राहू शकत नाही. मेहनतीने केलेली कमाई हाच खरा आनंद आहे. स्वतःकमवलेले धन श्रेष्ठ असते.

Trending