पैसे कमावण्याच्या नादात लोक स्वतःचा जीवही पणाला लावतात

एका शहरात एक व्यापारी राहायचा, तो समुद्र मार्गाने दुसऱ्या देशात जाऊन व्यापार करायचा, एके दिवशी समुद्रात वादळ आले, व्यापाऱ्याने शरीराला डबे बांधून समुद्रात उडी मारली, त्यानंतर त्याचे काय झाले असेल?

रिलिजन डेस्क

Mar 31,2019 12:03:00 AM IST

एक व्यापारी समुद्र मार्गाने इतर देशांमध्ये व्यापार करण्यासाठी जात होता. परंतु त्याला पोहोता येत नव्हते. त्याच्या काही मित्रांनी त्याला समजावून सांगितले की, तू समुद्रातून प्रवास करतो आणि प्रवासात कधी वादळ आले तर तुला जीव वचवण्यासाठी पोहोता येणे आवश्यक आहे.

त्यालाही मित्रांचा सल्ला योग्य वाटला परंतु त्याच्याकडे पोहायला शिकण्यासाठी वेळ नव्हता. तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला आणखी एक उपाय सांगितला. तू प्रवासाला निघाल्यानंतर सोबत काही रिकामे डबे घेऊन जा. प्रवासात वादळ आले आणि जहाज बुडू लागले तर रिकामे डबे शरीरावर बांधून पाण्यात उडी मार. यामुळे तुझा जीव वाचेल.


हा उपाय व्यापाऱ्याला खूप सोपा वाटला. पुढच्या प्रवासाला जाताना त्याने रिकामे डबे जहाजात ठेवले. आपले सामान इतर देशांमध्ये विकून परत येताना अचानक वादळ सुरु झाले. ज्या लोकांना पोहता येत होते त्यांनी समुद्रात उड्या मारल्या परंतु व्यापारी तेथेच अडकला.


तेवढ्यात व्यापाऱ्याला मित्रांचा उपाय आठवला. तो रिकामे डबे शरीरावर बांधत असताना त्याचे लक्ष सामान विकून आलेल्या पैशांवर गेले. त्यानंतर त्याने एका डब्यात पैसे भरून डबा शरीरावर बांधून समुद्रात उडी मारली. पैशांच्या ओझ्यामुळे त्या व्यापाऱ्याला जीव गमवावा लागला.


लाईफ मॅनेजमेंट
जीवनात अनेकवेळा अशी पिरिस्थिती निर्माण होते की, आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे हेच समजत नाही. आपण पैसे कमावण्याच्या शर्यतीमध्ये हेसुद्धा पाहू शकत नाहीत की आपल्या हातून काय निघून जात आहे. मित्र, नातेवाईक एवढेच नाही तर कुटुंबासाठीसुद्धा आपल्याकडे वेळ नसतो. आपल्या लक्षात काही येईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. यामुळे आजच निश्चित करा की, आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काय आहे पैसा की आपले आयुष्य.

X
COMMENT