जे लोक विचारात अडकून पडतात त्यांना स्वतःचे लक्ष्य गाठण्याची इच्छाच नसते 

एक मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाण्याची बॉटल विकत होता, एके दिवशी ट्रेनमध्ये बसलेल्या शेठने त्याला बोलावले आणि बॉटलचा रेट विचारला, मुलगा म्हणाला- 10 रुपयाला एक बॉटल, शेठ म्हणाला- 7 रुपयात देणार का? त्यानंतर मुलाने काय केले?

Apr 04,2019 12:01:00 AM IST

एक 15 वर्षांचा मुलगा रेल्वे प्लॅटफॉर्मवर पाणी विकायचा. यातून मिळालेल्या पैशाने घर चालवायचा. एके दिवशी पाणी विकत असताना ट्रेनमध्ये बसलेल्या एका शेठजीने त्याला आवाज देऊन जवळ बोलावून घेतले. मुलगा पळत-पळत त्याच्याकडे गेला आणि पाण्याची बॉटल शेठकडे दिली, शेठजीने विचारले किती पैसे?


मुलगा म्हणाला- 10 रुपयाला एक बॉटल.
शेठ म्हणाला- 7 रुपयात देणार का?
शेठजीचे बोलणे ऐकून मुलगा गालातल्या गालात हसला आणि पुढे निघून गेला. शेठजीजवळ एक संत बसलेले होते. त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्यांना एकच प्रश्न पडला की, मुलगा हसून पुढे का निघून गेला, नक्की यामागे काहीतरी रहस्य असावे.


महात्मा ट्रेनमधून खाली उतरले आणि पाणी विकणाऱ्या मुलाच्या मागे-मागे गेले. थोडे दूर गेल्यानंतर त्यांनी मुलाला थांबवले आणि विचारले- शेठजीने पाणी बॉटलचा मोल-भाव केल्यानंतर तू कशामुळे हसला? मुलगा म्हणाला- महाराज, मला हसू यामुळे आले की शेठजीला तहान लागलीच नव्हती. ते फक्त बॉटलची किंमत विचारात होते.
महात्माने विचारले- तुला असे का वाटले की, शेठजीला तहान लागली नव्हती?


मुलाने उत्तर दिले- महाराज, ज्या व्यक्तीला खरंच तहान लागते तो कधीही पाण्याचा भाव विचारत नाही. तो तर पहिले बॉटल घेऊन पाणी पितो आणि नंतर विचारतो किती पैसे द्यायचे?
पहिले भाव विचारण्याचा अर्थ तहान लागलेली नाही. संतालाही मुलाचे म्हणणे पटले आणि ते ट्रेनमध्ये जाऊन बसले.


लाईफ मॅनेजमेंट
प्रत्येक व्यक्तीला जीवनात काही-न-काही प्राप्त करण्याची इच्छा असते. काही लोक कोणताही तर्क-वितर्क न लावता आपले लक्ष्य गाठण्याच्या मागे लागतात आणि यशस्वी होतात. याउलट काही लोक प्रत्येक गोष्टीमध्ये त्रुटी काढतात किंवा विचारात अडकून पडतात. याचे कारण म्हणजे त्यांना लक्ष्यापर्यंत जायचेच नसते, ते फक्त स्वतःच्या विचारातच अडकून पडतात.

X