Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | moral Story of rich man and saint

आजारापासून दूर राहायचे असल्यास शरीराला आळशी बनवू नका, मेहनत करा

रिलिजन डेस्क | Update - Apr 23, 2019, 08:07 AM IST

एका गावामध्ये एक शेठजी राहत होते, त्यांच्याकडे सर्व सुख-सुविधा होत्या परंतु त्यांना रात्री झोप लागत नव्हती, एके दिवशी दि

 • moral Story of rich man and saint

  एका गावात एक शेठजी राहात होते. त्यांच्याजवळ भरपुर संपत्ती होती. मोठी हवेली, नोकर चाकर आणि सुख-सुविधांच्या सर्व गोष्टी शेठजीकडे होत्या. पण एवढ्या सर्व गोष्टी असूनही शेठजीला एक समस्या होती ती म्हणजे त्यांना रात्री झोप येत नव्हती. जरी झोप लागली तरी वाईट स्वप्न पडत होते आणि शेठजी नेहमी अस्वस्थ राहायचे. शेठजीने यावर खूप उपचार केला पण काही फायदा झाला नाही. असेच काही दिवस निघून गेले. एकदा गावामध्ये एक विद्वान संत आले. ते लोकांच्या समस्या लगेच सोडावायचे. शेठजीला जेव्हा या संताबद्दल कळले तेव्हा शेठजी संतांना भेटायला आले. शेठजीने संतांना आपली समस्या सांगितली.


  संत म्हणाले, या समस्येचे कारण आपली अपंगता आहे. शेठजीने आश्चर्याने संताकडे पाहिले आणि संताला म्हणाले, गुरूजी माझे सर्व अवयव चांगले आहेत. तर तूम्ही मला अपंग का म्हणताय, यावर संत हसून शेठजीला म्हणाले, अपंग तो नसतो ज्याच्याकडे अवयव नसतात किंवा त्याचे शरीर कमजोर असते, खरे म्हणजे अपंग व्यक्ती तो असतो जो हाथ पाय चांगले असूनही त्यांचा उपयोग करत, काम करत नाही.


  संताने शेठजीला विचारले सांगा तूम्ही दिवसभर काय काम करता, शेठजीने म्हणाले मी दिवसभर काहीच काम करत नाही, मला काम करायची काहीच गरज नाही कारण, माझे नोकर-चाकरच सर्व काम करतात. संताने सांगितले की हेच तूझ्या समस्यचे मुळ कारण आहे. जर यापासून सुटका करायची असेल तर दिवसभर एवढे काम करा की थकून जाल. कष्टाची ताकद दोन दिवसात आपली समस्या दूर करील. शेठजीच्या लक्षात आले की आतापर्यंत ते काय चूक करत होते.


  लाइफ मॅनेजमेंट
  शरीराला आपण जेवढा आराम देणार तितकेच आपले शरीर आळशी होत जाईल. आळशी शरीर लठ्ठ होत जाते आणि यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. यासाठी शक्य असेल तेवढे काम दिवसभर करा. यामुळे आपले शरीर स्वस्थ राहील आणि आपण आजारापासून दूर राहील.

Trending