Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | moral Story of rich man and Thief, story in Marathi

आपण एखाद्याचे वाईट केले तर आपल्यासोबतही वाईटच घडणार याची शक्यता वाढते

रिलिजन डेस्क | Update - Apr 07, 2019, 12:02 AM IST

एक शेठजी अत्यंत दयाळू होते, ते सर्वांना उसने पैसे द्यायचे, पैसे देताना फक्त एकच प्रश्न विचारायचे- कर्ज केव्हा फेडणार, या

 • moral Story of rich man and Thief, story in Marathi

  एक शेठजी अत्यंत दयाळू होते. त्यांच्याकडे कोणताही व्यक्ती पैसे मागण्यासाठी गेल्यानंतर ते त्याला नाही म्हणायचे नाहीत. शेठजी उसने पैसे घेणाऱ्याला फक्त एकच प्रश्न विचारायचे- तू पैसे परत कधी करणार, या जन्मात की पुढच्या जन्मात? प्रामाणिक लोक याच जन्मात परत देतो असे म्हणायचे तर धोकेबाज लोक पुढील जन्मात म्हणायचे.


  धोकेबाज लोक शेठजीला मूर्ख समजायचे. ते म्हणायचे किती मूर्ख आहे हा माणूस, पुढील जन्मात कोणी पैसे करत असतो का? एकदा एक चोर शेठजींकडे पैसे मागण्यासाठी पोहोचला. शेठजीने त्यालाही तोच प्रश्न विचारला, पैसे परत कधी देणार या जन्मात की पुढच्या?


  चोर म्हणाला- पुढील जन्मात. शेठजीने पैसे काढून त्याला दिले. शेठजीच्या तिजोरीत भरपूर पैसे असल्याचे चोराने पाहिले. चोराने शेठजीच्या घरी चोरी करण्याची योजना आखली. रात्री सर्वजण झोपल्यानंतर चोर शेठजीच्या घरात घुसला.


  चोर म्हशीच्या गोठ्यात उभा राहून योग्य वेळेचे वाट पाहत होता, तेवढ्यात त्याच्या कानावर दोन्ही म्हशीचे बोलणे पडले. दोन म्हशी एकमेकींशी बोलत होत्या. एका म्हशीने दुसऱ्या म्हशीला विचारले- तू आजच येथे आलीस का? दुसऱ्या म्हशीने उत्तर दिले- हो, मी मागील जन्मात शेठजींकडून पैसे घेतले होते आणि ते आता फेडण्यासाठी आले आहे. तू केव्हापासून येथे आहेस?


  पहिल्या म्हशीने उत्तर दिले- मला येथे तीन वर्ष झाले आहेत. मी शेठजींकडून कर्ज घेतले होते आणि पुढील जन्मात परत देईल असे सांगितले होते. शेठजींकडून कर्ज घेतल्यानंतर माझा मृत्यू झाला आणि मी म्हैस बनून येथे आले. आता दूध देऊन कर्ज फेडत आहे. जोपर्यंत कर्जाचे पूर्ण पैसे जमा होत नाहीत, मला येथेच राहावे लागेल.


  चोर दोन्ही म्हशीचे बोलणे ऐकून चकित झाला. त्याला काय करावे काही सुचेना. त्याच्या लक्षात आले की, कर्ज घेतल्यानंतर ते फेडावेच लागते मग ते या जन्मात किंवा पुढच्या जन्मात. दुसऱ्या दिवशी चोराने शेठजीचे पैसे परत केले आणि चोरी करणेही सोडून दिले.


  लाइफ मॅनेजमेंट
  आपण एखाद्यासोबत वाईट वागताना कधीही विचार करत नाही की याचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडेल. छोट्या-छोट्या चुका ज्यावेळेस मोठी अडचण बनून समोर उभ्या राहतात तेव्हा आपण विचार करतो की, मी कोणाचे काय वाकडे केले आहे म्हणून मला हे दुःख सहन करावे लागत आहे. अशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये यासाठी, कधीच इतरांचे वाईट करू नये आणि असे करण्याचा विचारही करू नये.

Trending