कामाचे प्लॅनिंग न करता काम सुरु केल्यास नुकसानच सहन करावे लागते

तरुणाने टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगून किती पैसे घेणार असे विचारले, ड्रायव्हर म्हणाला 200 रुपये, तरुण पायीच निघाला, थोड्या अंतरावर जाऊन त्याने पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरला विचारले, ड्रायव्हरने यावेळेस 400 रुपये सांगिलते...त्यानंतर तरुणाने काय केले?

Apr 05,2019 12:02:00 AM IST

एक तरुण 2 मोठ्या बॅग घेऊन रेल्वे स्टेशनवर उतरला. त्याने एका टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगितला आणि किती पैसे घेणार असे विचारले. टॅक्सी ड्रायव्हरने त्या पत्त्यावर नेऊन सोडण्याचे त्याला 200 रुपये सांगितले.


> तरुणाला वाटले टॅक्सीवाला जास्त पैसे सांगत आहे. यामुळे त्याने टॅक्सी कॅन्सल करून स्वतःच जड बॅग घेऊन जाण्याचे ठरवले. काही अंतरावर पुन्हा त्याला तोच टॅक्सीवाला दिसला. तरुणाने विचार केला की, अर्धा रस्ता तर मी आले आहे आणि आता टॅक्सी केली तर पैसेही अर्धेच द्यावे लागतील.


> तरुणाने पुन्हा टॅक्सी ड्रायव्हरला विचारले- भैया, आता तर मी अर्धे अंतर स्वतःच पूर्ण केले आहे, आता तुम्ही किती पैसे घेणार?


> टॅक्सी ड्रायव्हर हसून म्हणाला- 400 रुपये. ड्रायव्हरचे उत्तर ऐकून तरुण चकित झाला आणि म्हणाला- पहिले तुम्ही 200 रुपये सांगिलते आणि आता 400 रुपये सांगत आहात, विशेष म्हणजे मी अर्धा रास्ता पूर्ण केला आहे. तुम्ही तर सरासर लूट करत आहात.


>टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला- तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे, तुम्ही त्या ठिकाणाच्या उलट्या दिशेला जात आहात म्हणजे तुम्ही तुमच्या पत्त्याजवळ जाण्याऐवजी दूर पोहोचला आहात. तरुणाने टॅक्सी ड्रायव्हरकडे पाहिले आणि गुपचूप टॅक्सीमध्ये जाऊन बसला.


लाईफ मॅनेजमेंट
अनेकवेळा आपण कामाचे प्लॅनिंग न करता काम सुरु करतो आणि स्वतःची वेळ तसेच मेहनत वाया घालवतो आणि काम अपूर्णच सोडून देतो. यामुळे कोणतेही काम सुरु करताना चांगल्याप्रकारे विचार अवश्य करावा.

X