प्रत्येक समस्यचे समाधान हवे आहे परंतु जबाबदारी पार पाडताना मागे सरकतात

एका नगरात दुष्काळ पडला, साधूने सांगितले- अमावास्येच्या रात्री सर्व लोकांनी विहिरीत एक-एक तांब्या दूध टाकल्यास या अडचणीतून मार्ग निघू शकतो, सर्वांनी तसेच केले, दुसऱ्या दिवशी सकाळी विहिरीत दुधाऐवजी वेगळेच काही तरी होते...

रिलिजन डेस्क

Apr 10,2019 12:02:00 AM IST

प्राचीन काळी एका नगरात अनेक वर्ष पाऊस पडला नाही. यामुळे भयंकर दुष्काळ पडला. अन्न-पाण्याच्या शोधात लोक दुसऱ्या नगरात जाऊ लागले. नदी, तलाव, विहिरी कोरडे पडल्यामुळे पशु-पक्षी मरू लागले. तेथील राजा हे सर्व पाहून दुःखी झाला. या समस्येवर काय उपाय काढावा याच्या विचाराने राजा चिंतीत होता. यावर उपाय शोधण्यासाठी राजाने जंगलातील एका साधूला बोलावून घेतले आणि त्याला सर्व परिस्थिती सांगितली.


साधू म्हणाला - नगरच्या मधोमध एक विहीर आहे. उद्या अमावास्येच्या रात्री नगरातील सर्व लोकांनी त्या विहरीमध्ये एक-एक तांब्या दूध टाकल्यास तुझ्या राज्यात पाऊस पडू शकतो. एवढे सांगून साधू निघून गेले.


राजाने सर्व प्रजेमध्ये दवंडी दिली की, अमावास्येच्या रात्री सर्वांनी नगराच्या मधोमध असलेल्या विहिरीत एक तांब्याभर दूध टाकावे. यामुळे राज्यात पाऊस पडू शकतो. त्या नगरात एक लोभी व्यापारी राहत होता. विहिरीत दूध टाकण्याची दवंडी त्यानेही ऐकली होती. व्यापाऱ्याने विचार केला की, रात्री अंधारात सर्वजण एक-एक तांब्या दूध विहिरीत टाकतील परंतु मी दुधाऐवजी एक तांब्या पाणी टाकले तर कोणाला काय कळणार?


अमावास्येच्या रात्री सर्व लोकांनी विहिरीत एक-एक तांब्या दूध टाकणे सुरु केले. यादरम्यान व्यापाऱ्याने हळूच एक तांब्याभर पाणी विहिरीत टाकले आणि घरी निघून आला. सर्व प्रजेने रात्रीच हे काम पूर्ण केले होते.


दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने विहिरीत डोकावून पाहिल्यास त्याला विहिरीत एक थेंबही दूध दिसले नाही सर्व पाणीच होते. राजाला वाटले की सर्व लोकांनी अंधाराचा फायदा घेत दुधाऐवजी विहिरीत पाणी टाकले.


राजाने विचार केला की, ज्याठिकाणी असे लोक राहत असतील तेथे राजा बनून राहण्यात काहीच अर्थ नाही. राजाने एक दुसरे नगर स्थापित करण्याची घोषणा केली आणि तेथून निघून गेला.

X
COMMENT