आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशी:मोरेने ज्ञानदीपच्या मुलांना करायला लावली श्रमाची कामे

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानदिप आधार आश्रमात अल्पवयीन मुलांकडून श्रमाचे कामे करुन घेतल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले असून आडगाव पोलिसांनी मोरेच्या विरोधात बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयित मोरेच्या विरोधात बलात्काराचे ७ गुन्हे दाखल आहेत. मोरेची रवानगी मध्यवर्ती कारागृहात केली.

पोलिसांच्या माहितीनुसार, जानेवारी २०२० ते एप्रिल २०२२ या कालावधीत द किंग फाउंडेशन ज्ञानदीप गुरुकुल आधार आश्रम मानेनगर येथे शिक्षणासाठी वास्तव्यास असतांना संशयित हर्षल मोरेचे वृंदावन नगर येथे रो हाऊस आहे. तो आश्रमातून मुलांना येथे घेवून जात धान्य निवडण्याचे काम तसेच कागदी द्रोण बनवण्याचे काम विना मोबदला करुन घेत होता. हे द्रोण तो खुल्या मार्केटमध्ये तसेच होलसेल विक्री करण्यास पाठवत होता.

बातम्या आणखी आहेत...