आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक काेटीपेक्षा अधिक भाविकांनी घेतले दगडूशेठचे ऑनलाइन दर्शन, अमेरिका, ऑस्ट्रेलियाच्या भाविकांना लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात पुण्यातून झाली असल्याने येथील गणेशोत्सव जगभरात वैशिष्ट्यपूर्ण समजला जाताे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जगाच्या कानाकाेपऱ्यातून माेठ्या प्रमाणात भाविक गर्दी करत असतात. मात्र, ज्यांना प्रत्यक्षरीत्या पुण्यात गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणे शक्य नाही, असे भाविक दगडूशेठ हलवाई संकेतस्थळाच्या माध्यमातून गणपतीचे दर्शन घेत असतात. यंदाच्या वर्षी मागील २० दिवसांत देश-परदेशातील एक काेटीपेक्षा जास्त भाविकांनी दगडूशेठचे अाॅनलाइन दर्शन घेतले. तर, संकेतस्थळाच्या माध्यमातून ३० हजार भाविकांनी लाइव्ह दर्शन घेत अापली मनाेकामना पूर्ण केली. 


श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे अाॅनलाइन दर्शन घेण्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, काेल्हापूर, अाैरंगाबाद, बंगळुरू, ठाणे, सुरत, नवी मुंबर्इतील भाविकांची संख्या माेठ्या प्रमाणात अाहे. त्याचसाेबत देशातील विविध शहरांतील गणेश भक्त दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत असून परदेशातील भाविकांची संख्या ही माेठी अाहे. अमेरिका, यूएई, नेपाळ, अाॅस्ट्रेलिया, यू.के., कॅनडा, थायलंड या देशातील भाविकांनी दगडूशेठ गणपतीचे अाॅनलाइन दर्शन घेतले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी फेसबुक पेज, यूट्यूब, गणपती बाप्पा अॅप या माध्यमातून गणपतीच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात अाली असून त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अाॅनलाइन गणेश अभिषेक व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात येत अाहे. मात्र, बुकिंग खूप झाल्याने सध्या अाॅनलाइन अभिषेक बुकिंग थांबवण्यात अाले अाहेत. 


सामाजिक कामास भाविकांचा प्रतिसाद 
श्रीमंत दगडूशेठ हलवार्इ गणपती ट्रस्टचे विश्वस्त अशाेक गाेडसे 'दिव्य मराठी'शी बाेलताना म्हणाले, दगडूशेठ गणपतीची कीर्ती जगभरात पाेहोचलेली असून माेठ्या प्रमाणात भाविक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या दर्शन घेऊन यथाशक्ती दान करत अाहेत. देश-परदेशातील भाविक अाॅनलाइन माध्यमातून गणपतीचे दर्शन घेत असून दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत अाहे. मिळालेल्या दानातून समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत मदत पाेहोचवण्यात येत अाहे. 

बातम्या आणखी आहेत...