आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 10,000 Rohingyas Living Illegally Are Endanger For The Security Of The Country

बेकायदा राहणाऱ्या 10 हजारांहून जास्त रोहिंग्यांमुळे देशाच्या सुरक्षेलाच धोका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो

जम्मू : देशात बेकायदा वाढू लागलेल्या रोहिंग्या मुस्लिमांच्या लोकसंख्येमुळे भविष्यात सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती सुरक्षा संस्थांकडून व्यक्त केली जात आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देेशात सुमारे ४० हजार रोहिंग्या बेकायदा ठाण मांडून आहेत. पैकी १० हजाराहून जास्त रोहिंग्या जम्मू-काश्मीरातील जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी, डोडा, पुंछ, अनंतनाग जिल्ह्यातील आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये एक दशकापासून रोहिंंग्यांच्या लोकसंख्येत वेगाने वाढ होत आहे. जानेवारी २०१७ मध्ये जम्मू-काश्मीरच्या तत्कालीन मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विधानसभेत राज्यात ५ हजार ७०० रोहिंग्या राहत असल्याची माहिती दिली होती. २ फेब्रुवारी २०१८ राेजी विधानसभेत मांडलेल्या अहवालानुसार राज्याच्या विविध ३९ ठिकाणी ६ हजार ५२३ रोहिंग्या मुस्लिम राहतात. एक वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदा रोहिंग्यांच्या लोकसंख्येत एक हजाराने वाढ झाली आहे. लष्कराच्या छावणीपासून जवळच रोहिंग्यांची वस्ती आहे. त्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. जम्मू-काश्मीरच्या गृह विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार दहशतवादी घटनांत एका रोहिंग्याचा सामील असल्याचे आढळून आले नाही. परंतु ५० रोहिंग्यांवर दोन डझनावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. राज्यातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते नेहमीच रोहिंग्यांना हटवण्याची मागणी करत आले आहेत. आम्ही परत म्यानमारला जाऊ इच्छितो. परंतु तेथील परिस्थिती योग्य नाही. मृत्यू होण्याची भीती वाटते, असे रोहिंग्या समुदायातील काहींनी 'भास्कर' ला सांगितले.

रोहिंग्यामुळे धोका का?

- बेकायदा राहणाऱ्या रोहिंग्या मुस्लिमांचे बायोमेट्रिक रेकॉर्ड सुरक्षा संस्थांकडे नाही
- जम्मू-काश्मीरमध्ये ४०० हून जास्त रोहिंग्यांकडे यूएनएचसीआरचे निर्वासितांचे कार्ड आहे. सुंजवा लष्करी तळाजवळ रोहिंग्यांचे ४८ कुटुंबातील २०६ लोक
- दक्षिण काश्मीरमध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये चकमकीत दोन परदेशी ठार झाले होते.
 

बातम्या आणखी आहेत...