आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एस्केलेटरमुळे पुन्हा अपघात, 5 सेकंदात 25 जखमी एक्सपर्ट म्हणाले-लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी फॉलो कराव्या 8 Tips

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - काही काळापूर्वी उत्तरप्रदेशच्या आगरामध्ये रेस्ले स्टेशवर लावलेल्या एस्केलेटरमध्ये एका मुलाचा हात अडकला होता. आता मंगळवारी इटलीची राजधानी रोमच्या एका मेट्रो स्टेशनमधील एस्केलेटर (इलेक्ट्रीक पायऱ्या) मध्ये बिघाडामुळे 20 हून अधिक लोक जखमी झाले. त्यापैकी एकजण गंभीर आहे. जखमींमध्ये बहुतांस फुटबॉल फॅन्सचा समावेश असून ते दारु प्यायलेले होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. 


हे सर्व एस्केलेटरवर डान्स आणि उड्या मारत होते, अशी माहिती समोर आली आहे. मात्र जखमींनी याबाबत बोलण्यास नकार दिला. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या एस्केटेलटरचा वापर करताना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे असे अपघात टाळता येऊ शकतात. 

 

काय म्हणाले एक्सपर्ट.. अशी घ्या काळजी 
1. इंजीनियर जोशी यांनी सांगितले की, एस्केलेटरमध्ये दोन्ही बाजुला सपोर्टसाठी जे रेलिंग अशते त्याच्याखाली ब्रश लावलेले असतात. त्यात थोडा गॅप असतो. त्यामुळे याठिकाणी ओढणी, साडी, कपडा किंवा मोठा गॅप असेल तर हातही अडकू शकतो. त्यामुळे कधीही एस्केलेटर वापरताना हात खालच्या बाजुला ठेवू नका. रेलिंगच्या वरच ठेवा. 
2. कपडे, ओढणी, साडी याची काळजी घ्या, ते गॅपमध्ये अडकू शकतात. 
3. एस्केलेटर टू-वे हॉरिझंटल आणि थ्री-वे हॉरिझंटलही असतात. टू-वे मध्ये दोन पायऱ्या एकत्र सुरू होतात. नंतर त्या सेपरेट स्टेपरमध्ये बदलतात. असा परिस्थितीत तुम्ही जेव्हा एस्केलेटरवर चढत असाल तेव्हा पायऱ्या ज्याठिकाणी एकमेकिंना चिटकलेल्या असेल तेव्हा त्यावर पाय ठेवू नका. अशावेळी बॅलेन्स बिघडल्यामुळे तुम्ही पडू शकता. तुमचे पाय नेहमी एकाच पायरीच्या मध्यभागी ठेवा. 
4. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना एकटे एस्केलेटरवर चढू देऊ नका. त्यांना कडेवर घेऊनच चढा किंवा उतरा. 
5. साधारणपणे एक एस्केलेटर 2.5 सेकंदात 1 मीटर जाते. वेगवेगळ्या ठिकाणी याची स्पीड वेगवेगळी असते. तसे पाहता ही स्पीड फार धोकादायक नसते. तरीही एस्केलेटर चालता चालता थांबले तर तुमचे बॅलेन्स बिघडू शकते. त्यामुळे रेलिंगच्या सहाऱ्यानेच एस्केलटरमध्ये वर-खाली जावे. 
6. फार गर्दी असेल तर शक्यतो एस्केलेटरचा वापर करू नका. गर्दी जास्त असल्यास एखाद्याचे बॅलेन्स गेले तर त्याच्याबरोबर तुमचाही अपघात होऊ शकतो. 
7. मुलांबरोबरच कोणत्याही वयस्कर व्यक्तीला एस्केलेटरवर एकटे जाऊ देऊ नका. 
8. ज्या एस्केलेटरवर मेंटेनेन्सची वॉर्निंग लावलेली असले त्यावर बंद असेल तरी जाऊ नका. त्याठिकाणी अपघात गोण्याची शक्यता असते.

बातम्या आणखी आहेत...