आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इश्फाक उल हसन
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला १०८ दिवस पूर्ण झाले. या कालावधीत काश्मीर खोऱ्यातील जनजीवन वेगाने पूर्ववत होत आहे. रस्त्यावरील वाहतूक सुरळीत झाली आहे. २० हजारांहून जास्त शाळांत विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसून आला. विद्यार्थ्यांना गणवेशाऐवजी साध्या कपड्यात शाळेत जाण्याची सूचना प्रशासनाने केली. दहशतवादी कारवायांपासून सुरक्षेसाठी खबरदारी घेतली जात आहे. स्कूल व्हॅनच्या मालकांनीही पालकांना विश्वासात घेऊन काम सुरू केले आहे. पुन्हा काम सुरू झाल्यानंतर एक-दीड महिन्यात नुकसान भरपाई होऊ शकेल. काश्मीरमधील शिक्षणतज्ञ बशीर अहमद यांच्या मते शैक्षणिक सत्राच्या २५० दिवसांपैकी १५० दिवस निघून गेले आहेत. त्यापैकी १०० दिवस केवळ बदललेल्या परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा परिणाम आहे. दुसरीकडे बाजारपेठ आता दररोज गजबजू लागली आहे. आता श्रीनगरची नाडी असलेला लाल चौक बाजारही दिवसभर खुला असतो. फुटपाथवर फेरीवाल्यांची दुकाने दिसतात. एक दुकानदार गुलाम मोहंमद म्हणाले, आम्ही तीन-चार महिन्यांपासून विनारोजगार बसलेलो होतो. काश्मीरमध्ये ७ नोव्हेंबरच्या सुरुवातीला बर्फवृष्टीमुळे मला पर्यटकांची संख्या वाढेल असा विश्वास निर्माण झाला. त्यामुळे आमची दुकाने चालतील. म्हणूनच आम्ही कामाला लागलो आहोत. सरकारने २ ऑगस्टला अमरनाथ यात्रेवरील दहशतवादी हल्ल्याची भीती लक्षात घेऊन सूचना जारी केली होती. त्यानंतरही ५ ऑगस्ट ते १० ऑक्टोबरपर्यंत ४ हजार २३१ पर्यटक काश्मिरात आले होते. त्यापैकी ९२८ परदेशी होते. पर्यटन विभागाने त्यास दुजोरा दिला आहे. सरकारने १० ऑक्टोबरला अॅडव्हायझरी परत घेतली.
पहलगाम, गुलमर्गमध्ये होणार स्केटिंग, आइस हॉकी
पर्यटन विभागाचे संचालक निसार अहमद वनी म्हणाले, डिसेंबरपासून पहलगाम, गुलमर्गमध्ये स्किइंग, स्केटिंग व आइस हॉकीचे आयोजन करण्यात येणार आहे. काश्मीरचे कलाकार हिमशिल्प साकारणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम होतील. नाताळ व नवीन वर्षात पर्यटकांच्या संख्येत वाढ व्हावी असा त्यामागील उद्देश आहे. जगभरातून योजनेवर चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या.
देशभरात काश्मीरचा प्रचार, नुकसान भरून काढणार
> पर्यटन विभागाचे संचालक निसार अहमद वनी म्हणाले, काश्मीर खोऱ्याबद्दल नकारात्मक विचारात आता बदल व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी देशभरात रोड-शो, प्रचार करू. दिल्ली व मुंबई विमानतळावर तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. वर्तमानपत्र व रेल्वेच्या माध्यमांतूनही काश्मीरच्या पर्यटनस्थळांचा प्रचार करू.
> परिस्थिती बदलल्याने काश्मिरातील उद्योग-व्यापाराला सुमारे १० हजार ५६ कोटी रुपयांचा फटका बसला. काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष शेख आशिक अहमद यांनी ही माहिती दिली. आता आम्ही सर्व हे नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.