आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • More Than 208 Teachers And Vc's Wrote Letter To Pm Modi; Said Left Wing Spoiling Atmosphere Of Educational Institutions Across The Country

208 शिक्षक आणि कुलगुरूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहीले पत्र, 'लेफ्ट विंगने देशभरातील शिक्षण संस्थांचे वातावरण खराब केले'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्र लिहणाऱ्यांमध्ये हरि सिंह गौर, सरदार पटेल यूनिव्हर्सिटी, बिहार सेंट्रल यूनिव्हर्सिटीचे व्हीसी सामील

नवी दिल्ली- जेएनयू हिंसाचारामुळे देशभरातील 200 पेक्षा जास्त विद्यापिठातील शिक्षक आणि कुलगुरूंनी आज(रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्र लिहीले. यात लेफ्ट विंगच्या कार्यकर्त्यांनी देशभरातील शिक्षण संस्थांमधील वातावरण खराब केल्याचा आरोप लावला आहे. या पत्राचे शीर्षक "शिक्षण संस्थांमध्ये वामपंथीविरोधातील विधान' असे दिले आहे.


शिक्षकांशिवाय पत्र लिहण्यात हरी सिंह गौर यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू आरपी तिवारी, दक्षिण बिहार सेंट्रल यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू एचसीएस राठौर, सरदार पटेल यूनिव्हर्सिटीते वीसी शिरीष कुलकर्णी सामील आहेत.

मोदींना लिहीलेल्या पत्रातील काही बाबी

  • "आम्ही खूप निराशेने हे बोलत आहोत की, विद्यार्थी राजकारणाच्या नावाने डाव्यांचा एजेंडा स्विकारत आहेत. नुकतच जेएनयू ते जामिया, एएमयू ते जादवपूरपर्यंतच्या घटना आपल्याला इशारा देत आहेत की, डाव्यांचे अॅक्टिविस्ट शिक्षणाचे वातावरण खराब करत आहेत."
  • "वाम पंथींच्या शिकवणीमुळे सार्वजनिकरित्या विधान करणे अवघड झाले आहे.''
  • "अशा मागण्यात, ज्यातून काहीच मार्ग काढता येत नाही, त्यावरुन आंदोलन करणे आणि लोकांना त्रास होईल अशा घटना घडवून आणण्याचे काम डावे करत आहेत."
  • "अशा राजकारणामुळे गरीब आणि दिनदुबळ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांवर त्याचा मोठा परिणाम पडतो. अशा विद्यार्थ्यांमुळे गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे."

हिंसेमागे केंद्र सरकारचा हात- काँग्रेस कमेटी

काँग्रेसची फॅक्ट फायंडिंग कमेटीने सांगितले की, जेएनयू कँपसमध्ये 5 जानेवारीला झालेल्या हिंसाचारामागे केंद्र सरकारचा हात आहे. कमेटीने यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू एम जगदीश कुमार यांना तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे. आज समितीने सोनिया गांधींना आपली रिपोर्ट दिली.