आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 दिवसात तीन कपांपेक्षा जास्त चहा प्यायल्याने होतात हे दुष्परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूनिव्हर्सिटी ऑफ ग्लासगोच्या अहवालानुसार एका दिवसात तीन कपापेक्षा जास्त चहा प्यायल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. आहारतज्ञ डॉ. अलका दुबे सांगतात की, चहामध्ये कॅफीनसोबतच असे अनेक पोषकद्रव्ये असतात, जे जास्त प्रणामात घेतल्याने आरोग्याला नुकसान होऊ शकते. डॉ. दुबे जास्त चहा प्यायल्यामुळे होणा-या दुष्परिणामांविषयी सांगत आहेत. 


दुष्परिणाम 
यामध्ये अॅल्युमिनियम सारखे अनेक टॉक्सिन्स असतात. 
नुकसान :
यामुळे बारीक पुरळ, मुरूम यासारख्या त्वचेसंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. 


चहामध्ये कॅफीन असते. 
नुकसान
: जास्त चहा प्यायल्याने अस्वस्थता वाढते. 


चहामध्ये टॅनिन, टायलिन असते. 
नुकसान :
पचन होत नाही त्यामुळे पोटाची समस्या वाढू शकते. 


चहामध्ये फ्लोराइड अधिक प्रमाणात असते. 
नुकसान :
यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात. (न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनचे संशोधन) 


चहामध्ये फायटोकेमिकल्स असतात. 
नुकसान :
जास्त चहा प्यायल्याने झोप न येण्याची समस्या होऊ शकते. 


यामध्ये कॅफीनमुळे अॅडिक्शन होऊ शकते. 
नुकसान
: चहा न मिळाल्यावर डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा जाणवतो. 


जास्त गरम चहा प्यायल्याने तोंडाला पोटापर्यंत जोडणा-या नलिका डॅमेज होतात. 
नुकसान :
यामुळे कर्करोग होऊ शकतो. (ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित संधोधनानुसार) 

बातम्या आणखी आहेत...