आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासमस्तीपूर(बिहार)- समस्तीपूरच्या विभुतीपूरमध्ये श्रावनाच्या पहिल्या सोमवारी बुडी गंडक नदीत 25 लोकांनी डुबकी मारुन 300 पेक्षा अधिक साप पकडले. नंतर त्यांना भगवती मंदिरात नेऊन त्यांची पुजा केली. यावेळी अनेकांनी हे साप आपल्या गळ्यात अडकवले होते.
विभुतीपूरच्या सिंघिया घाट पश्चिमच्या पंचवटी चौकातील भगवती मंदिरात दरवर्षी नागपंचमीच्या आधी दरवर्षी लोक नदीतील साप पकडतात. गावातील भगत रामसिंह यांनी सांगितले की, त्यांचे पुर्वज 1868 पासून माता विषधरची पुजा करत आहेत. ही पुजा सुरुवातीला त्यांच्या घरी व्हायची. पण 1951 ला मंदिर बांधल्यापासून ही पुजा मंदिरात केली जाते. या पुजेला शेजारील गावातील लोकही सामील होतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.